AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये प्रचंड मोठा भूकंप ? विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार, अनेक बैठका झाल्या ?; थेट मंत्र्यानेच टाकला बॉम्ब

राज्याचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार आहेत. त्यांच्या भाजप नेत्यांशी अनेक चर्चा झाल्या. मी या चर्चांचा साक्षीदार आहे, असा खळबळजनक दावा अत्राम यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अत्राम यांच्या या दाव्यावर वडेट्टीवार यांनी खुलासा केला आहे.

काँग्रेसमध्ये प्रचंड मोठा भूकंप ? विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार, अनेक बैठका झाल्या ?; थेट मंत्र्यानेच टाकला बॉम्ब
| Edited By: | Updated on: Apr 11, 2024 | 1:55 PM
Share

काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बडे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. तसा दावाच राज्याचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी केला आहे. अत्राम यांनी थेट बॉम्बच फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वडेट्टीवार यांनी पक्षप्रवेशासाठी अनेक बैठका केल्याचा दावाही अत्राम यांच्याकडून करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा गौप्यस्फो केला आहे. विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये येणार आहेत. त्यांनी भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका केल्या आहेत. या बैठकांचा मी साक्षीदार आहे. या चर्चा झाली मला माहीत आहे, असं धर्मराव बाबांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

मी आदिवासी माणूस खोटं बोलणार नाही

मी आदिवासी माणूस आहे. आदिवासी माणूस खोटा बोलणार नाही, विजय वडेट्टीवार हे अशोक चव्हाण याचे राईटहॅंड आहेत. आता चव्हाणच भाजपमध्ये आले आहेत. त्यानंतर नामदेव उसंडी, प्रकाश देवतळे भाजपात आले आहेत. त्यानंतर लवकरंच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार भाजपात येणार आहेत. वडेट्टीवार भाजपात जाणार असल्याची चर्चा झालीय, असा दावाही अत्राम यांनी केलाय.

पैसे आहेत, पण बुद्धी नाही

विजय वडेट्टीवार यांनी धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडे पैसे आहे, पण बुद्धी नाही, अशी टीका केली होती. या टीकेनंतर धर्मराव बाबा यांनी थेट बॉम्बच फोडला आहे. वडेट्टीवार भाजपात येणार असल्याचा दावाच त्यांनी केला आहे.

दहा जागा जिंकणार

राष्ट्रवादीकडून मी गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून लढावं, अशी पक्षाची इच्छा होती. पण मला तिकीट मिळालं नाही, जागा भाजपकडे गेलीय. महायुतीचा नेता म्हणून मी अशोक नेते यांच्यासाठी प्रचार करतोय. विदर्भात महायुती 10 जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

मी कुठेही जाणार नाही

दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी धर्मराव बाबा अत्राम यांचा दावा खोडून काढला आहे. मी कुठेही जाणार नाही. मी काँग्रेसमध्येच आहे. धर्मरावबाबा खोटं बोलत आहेत. त्यांची नार्को टेस्ट करा. दूध का दूध अन् पानी का पानी होईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!