उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी काय नुसती भजी खायची का?; विनायक मेटे भडकले

सरकारने सर्वांना लटकवून ठेवायचं काम केलं आहे," असा आरोपही विनायक मेटेंनी केला आहे. (Vinayak Mete on Maratha Reservation hearing)

उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी काय नुसती भजी खायची का?;  विनायक मेटे भडकले
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 1:26 PM

मुंबई : “महाविकासआघाडी सरकार सर्वांनाच सांगतयं कोर्टात जा. जर सर्वच इतरांनी करायचं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाणांनी काय नुसत्या भजी खायच्या का?” असा टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. “मराठा आरक्षणाचा हा सर्व गोंधळ हा सरकारने आणि समितीने घातला आहे. सरकारने सर्वांना लटकवून ठेवायचं काम केलं आहे,” असा आरोपही विनायक मेटेंनी केला आहे. (Vinayak Mete on Maratha Reservation hearing)

सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी होती. मात्र, यावेळी राज्य सरकारचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्याने न्यायमूर्तींनी सुनावणी काही काळासाठी तहकूब केली. यावरुन विनायक मेटेंनी सरकारवर आरोप केला आहे.

आज कोण काय म्हणतं याला काही महत्त्व नाही. कायद्याच्या दृष्टीने जे काही मुद्दे असतील ते विचारात घ्यायला हरकत नाही. पण व्यक्तीगत मुद्दे ते एका द्वेषाने पछाडलेले आहेत, अशी टीका विनायक मेटेंनी केली.

“सरकारने सर्वांना लटकवून ठेवायचं काम केलंय”

अशोक चव्हाणांनी किंवा सरकारने जी भूमिका अगोदर घेणं अपेक्षित होतं ती त्यांनी आधी घेतली आहे. घटनापीठ स्थापन करावी आणि स्थगिती उठवण्याचा अर्ज सरकारने केला नाही. हा अर्ज सरकारने दोन ते तीन दिवसांपूर्वी केला. त्यापूर्वी अर्ज केला नव्हता. हा सर्व गोंधळ हा सरकारने आणि मराठा समाजाच्या समितीने घातला आहे. सरकारने सर्वांना लटकवून ठेवायचं काम केलं आहे, असे विनायक मेटे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या बद्दल सांगता तुम्ही कोर्टात जा. विद्यार्थ्याला सांगतात तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जा. जी नोकरभरती थांबलेली आहे, त्या विद्यार्थ्याला सांगतात तुम्ही कोर्टात जा, जर सर्वच इतरांनी करायचं आहे तर या सरकारने काय अशोक चव्हाणांनी, उद्धव ठाकरेंनी काय करायचं? असा प्रश्न विनायक मेटेंनी उपस्थित केला आहे.

हे सरकार मराठा आरक्षण किंवा इतर कोणत्याही समाजाबद्दल गंभीर नाही. फक्त घोषणा करते आणि दिशाभूल करतात. ही सुनावणी तहकूब झाल्याबाबत मत व्यक्त करणं घाईचं होईल. या खंडपीठाने चांगल्या पद्धतीने निर्णय द्यावा, असेही विनायक मेटे म्हणाले.

गेल्या 9 सप्टेंबरला जेव्हा स्थगिती आली, तेव्हा खंडपीठ स्थापन करुन त्या खंडपीठाच्या समोर अंतिरम स्थगिती उठवण्याची सुनावणी व्हावी हा अधिकृत पर्याय होता. यासाठी शासनाने बरेच दिवस घेतले, असेही मेटे म्हणाले. (Vinayak Mete on Maratha Reservation hearing)

संबंधित बातम्या : 

घटनापीठ गठीत करण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला पत्रच दिलं नाही; विनायक मेटेंचा आरोप

Maratha Reservation LIVE | अशोक चव्हाणांनी जमत नसेल तर राजीनामा द्यावा : धनंजय जाधव

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.