EWS चा आदेश काढताना राज्य सरकारकडून चालबाजी, विनायक मेटेंचा आरोप

राज्य सरकारनं EWSचा आदेश जारी करताना दोन चूका केल्याचा आरोप विनायक मेटेंनी केलाय. Vinayak Mete criticize MVA Government

EWS चा आदेश काढताना राज्य सरकारकडून चालबाजी, विनायक मेटेंचा आरोप
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 5:16 PM

बीड: शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी मराठा उमदेवारांना EWSचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्ण्याचं स्वागत केलं आहे. मात्र, राज्य सरकारनं या निर्णयाचा आदेश जारी करताना दोन चूका केल्याचा आरोप विनायक मेटेंनी केलाय. शासन आदेशातील त्या चूका म्हणजे राज्य सरकारची चालबाजी असल्याची टीकाही मेंटेंनी राज्य सरकारवर केलीय. (Vinayak Mete criticize MVA Government on GR of EWS Reservation for Maratha Students)

न्यायालयाच्या आदेशामुळे निर्णय

EWS आरक्षण हे केंद्र सरकारनं दिलेले आहे. राज्य सरकार केंद्राच्या कायद्याला रोखू शकत नाही. काही विद्यार्थी EWS आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयानं त्या विद्यार्थ्यांना EWS आरक्षणाचा लाभ देण्याचे आदेश दिले. यामुळे राज्य सरकारनं मराठा उमेदवारांना EWS चा लाभ देण्याचा निर्णय घेतल्याचं विनायक मेटेंनी सांगितले. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेल्या दिवसापासून मराठा उमेदवारांना EWSचा लाभ मिळावा अशी भूमिका शिवसंग्रामनं घेतल्याचं विनायक मेटेंनी सांगितले.

EWSच्या निर्णयात सरकारची चालबाजी

विनायक मेटेंनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केलेय. मात्र, निर्णयातील जीआर मध्ये दोन मोठ्या चूका या सरकारने केल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही राज्य सरकारची चालबाजी आहे. सरकारने फक्त 2020-21 च्या उमेदवारांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप विनायक मेटेंनी केला. संभाजीराजांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो ते मराठा समाजाची फसवणूक होऊ नये यासाठी बोलत आहेत, असं मेटे म्हणाले.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी अभ्यास करण्याची गरज आहे. अशोक चव्हाणांनी माझं नाव घेऊन टीका केली. अशोक चव्हाण हे काही वाचत नाहीत, कसलीही माहिती घेत नाहीत. त्यामुळे आज मराठा समाजाची ही परिस्थिती झाली, असा आरोप विनायक मेटेंनी केला.

प्रवीण गायकवाड हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मांडणी करतात. आरक्षण हे धर्मावर नसून जातीवर आहे. प्रवीण गायकवाड यांनी कसलाही संभ्रम निर्माण करू न करता समाजाचे हित बघावं, असं आवाहन विनायक मेटेंनी केले.

संबंधित बातम्या:

…तर मराठ्यांना OBC मधून आरक्षण मिळालंच पाहिजे, आबासाहेब पाटलांचा आक्रमक पवित्रा

Maratha reservation |..मग मराठा विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का?, वडेट्टीवारांचा सवाल

Maratha reservation | काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु! अशोक चव्हाणांचा कुणावर निशाणा?

(Vinayak Mete criticize MVA Government on GR of EWS Reservation for Maratha Students)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.