नाशिककरांनो मतदार नाव नोंदणी, दुरुस्ती करायची असल्यास ही कागपत्रे करा सादर!

नाशिककरांनो तुम्हाला मतदार नाव नोंदणी, नावात दुरुस्ती अथवा नाव यादीतून वगळायचे असल्यास अर्ज सादर करताना कागदपत्रांचे मूळ पुरावे जोडा. अर्ज सादर करताना सोबत सादर करावयाच्या पुराव्याचे मूळ कागदपत्रे स्कॅन करून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करा.

नाशिककरांनो मतदार नाव नोंदणी, दुरुस्ती करायची असल्यास ही कागपत्रे करा सादर!
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः नाशिककरांनो तुम्हाला मतदार नाव नोंदणी, नावात दुरुस्ती अथवा नाव यादीतून वगळायचे असल्यास अर्ज सादर करताना कागदपत्रांचे मूळ पुरावे जोडा. अर्ज सादर करताना सोबत सादर करावयाच्या पुराव्याचे मूळ कागदपत्रे स्कॅन करून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज भरताना सादर करण्यात आलेला वयाचा व सर्वसाधारण निवास स्थानाचा पुरावा हे अवाचनीय असल्याचे बऱ्याच प्रकरणात निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने सर्व सेतू संचालक, महा ऑनलाईन, आपले सरकार सेवा केंद्र चालक व खासगी संगणक सेवा केंद्र तसेच सर्व मतदार यांनी अर्ज भरताना कागदपत्रांच्या मूळ प्रती स्कॅन करून अपलोड बंधनकारक असून, अर्ज सादर करताना अपूर्ण माहिती व पुरावे नसलेले अर्ज रद्द करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. मतदार यादीसंदर्भात नाव नोंदणी, दुरुस्ती व नाव कमी करणेबाबत अर्ज सादर करताना अर्जातील प्रतिज्ञापत्र भागामध्ये कोणतेही खोटे कथन करणे हा लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 31 अन्वये दंडनीय अपराध आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.

अर्ज सादर करताना जोडावयाची कागदपत्रे

वय व जन्मतारखेच्या पुराव्यासाठी सक्षम अधिकारी यांनी दिलेले जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा पुरावा म्हणून 5 किंवा 8 किंवा 10 वी च्या गुणपत्रिकेची प्रत, भारतीय पारपत्र, पॅन कार्ड, वाहन चालन परवाना, आधारकार्डची प्रत तसेच रहिवासी पुराव्याकरिता बँक, किसान, टपाल कार्यालय चालू खाते पुस्तक, शिधावाटप पत्रिका, पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालन परवाना, आयकर निधारण आदेशाची प्रत, अलीकडील नोंदणीकृत भाडे करार, पाणी, दूरध्वनी, वीज, गॅस जोडणी बिलाची प्रत, भारतीय टपाल विभागाद्वारे अर्जदाराच्या नावे त्यांच्या सर्वसाधारण निवासस्थानाच्या पत्त्यावर प्राप्त झालेले कोणतेही टपाल किंवा ई-मेलची प्रत इत्यादी कागदपत्रांपैकी जन्मदाखला व निवास स्थानाचा कोणताही एक पुरावा अर्जासोबत जोडण्यात यावा.

फोटो असा हवा

अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे विशिष्ट रंगीत छायाचित्रा (3.5 से.मी. x3.5 सें.मी.) सह प्रत्येक इंचास 200 टिन (डीपीआय) विभेदन (रिझोल्यूशन सुस्पष्ट असणारे) अर्ज भरताना संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

पुन्हा वांदेः ‘डीपीसी’वरून आमदार कांदेंचा पंगा सुरूच; निधी वर्ग करू नका, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत थेट आत्मदहनाचा इशारा

भुजबळ-पंकजा नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर; भाजपच्या महापालिका सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देणाऱ्या आमदार फरांदेंनी जुळवून आणला योग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI