एक विवाह असाही… चक्क नवरी चढली घोड्यावर

मुलगा आणि मुलगी यांतील भेदभावाच्या दरीला सुरुंग लावत मुलीची हळदीची मिरवणूक घोड्यावर काढून नव्या पुरोगामी विचाराची प्रेरणी गोविंद नगरातील चद्रकांत उभाड या वधु पित्याने ही मिरवणूक काढली

एक विवाह असाही... चक्क नवरी चढली घोड्यावर

वर्धा : लग्न म्हटल की घोड्यावर फक्त नवरदेवच बसतो असेच चित्र आपल्याकडे आहे (Bride Ride On Horse Breaking Stereotypes). म्हणजे नवरदेवानेच घोड्यावर बसावे, अशी पुरुषप्रधान रुढी आपल्याकडे सर्वश्रुत आहे. परंतु मुलगा आणि मुलगी यांतील भेदभावाच्या दरीला सुरुंग लावत मुलीची हळदीची मिरवणूक घोड्यावर काढून नव्या पुरोगामी विचाराची प्रेरणी गोविंद नगरातील चद्रकांत उभाड या वधु पित्याने ही मिरवणूक काढली. हाच विषय शहरात चर्चेचा ठरला. मुलामध्ये आणि मुलीमध्ये आपण कोणताही भेद पाळत नसल्याचे त्यांनी कृतीतून सर्वांपुढे मांडले आहे (Bride Ride On Horse Breaking Stereotypes).

चद्रकांत उभाड यांना एक मुलगा एक मुलगी आहेत. मोठी मुलगी नुपूर हिने अभियंता पदवी घेतली असून ती सध्या पुण्यामध्ये नोकरी करत आहे. दरम्यान, मुळचा वाढोना येथील मुलासोबत नुपूरचा विवाह ठरला आणि हा विवाह थाटामाटात रविवारी पार पडला. दरम्यान, विवाहाच्या पूर्वसंध्येला नवरदेव राशी निघतो आणि घोड्यावर बसतो, असेच चित्र आतापर्यंत आपल्या भागात आपण आतापर्यंत पाहत आलेले आहोत.

मात्र, चंद्रकांत उभाड यांनी मुला मुलीत भेद पाळायचा नाही, असे ठरवून नुपूरला हळदीच्या दिवशी चक्क घोड्यावर बसवून मिरवणूक काढली. सुरुवातीला घोड्यावर बसण्यासाठी नुपूर काहीशी घाबरली. मात्र, तिच्या भवाने तिला धीर दिला. भावाच्या इच्छेला कुठेही छेद द्यायचा नाही म्हणून तिने हिम्मत दाखवली आणि थेट नवरी घोड्यावर बसली. नवरीची वरातीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे (Bride Ride On Horse Breaking Stereotypes).

नवरदेवाच्या वरातीत ज्याप्रमाणे बॅन्ड, फटाक्यांची आतषबाजी त्याचप्रमाणे या हळदीच्या वरातीतही पहायला मिळाली. उलट अलीकडे नवरदेवाच्या वरातीमागे मोजकेच नातेवाईक आणि लोकांची गर्दी दिसते. मात्र, नुपूर घोड्यावर बसलेली असताना परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी दिसत होती. विशेष उभाड याच्या कुंटूबातील अशा प्रकाची ही दुसरी घटना आहे. या आधी ही नुपूरची मावस बहीण चे 2 वर्षा आधी असेच घोड्यावर बसून मिरवणूक काढली होती. ही आगळीवेगळी वरात पाहून आजूबाजूचे सर्व नागरिक कुतूहलाने या वरातीकडे पाहत होते.

Bride Ride On Horse Breaking Stereotypes

संबंधित बातम्या :

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू गुपचूप बोहल्यावर

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI