Corona : भाजी-फळांचा पुरेसा साठा, संपूर्ण वर्धा जिल्हा क्वारंटाईनच्या मार्गावर

जिल्ह्यात एकही कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण सध्या नसला, तरी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतल्या जात आहे.

Corona : भाजी-फळांचा पुरेसा साठा, संपूर्ण वर्धा जिल्हा क्वारंटाईनच्या मार्गावर

वर्धा : जिल्ह्यात सध्या भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी (Wardha District Quarantine ) मुबलक साठा उपलब्ध असल्याची लक्ष वेधून घेणारी आकडेवारी समोर आली आहे. कृषी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या वर्धा भाजीपाला आणि फळांचे आगारच ठरले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील भाजी आणि फळांना प्रवेश नाकारुन संपूर्ण जिल्हाच क्वारंटाईन करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकही कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण (Wardha District Quarantine ) सध्या नसला, तरी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतल्या जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूची सेवा सुरु आहे. भाजीपाला आणि फळांची विक्री यात मोडते. परंतू जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी देखील प्रशासन घेत आले आहे. परिस्थिती हाताळताना प्रशासनाला सतर्क राहावे लागत आहे. त्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासनाने अधिक खबरदारी घेत इतर जिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाला आणि फळे या वस्तुंना प्रवेश बंद केला आहे. त्याचवेळी मटण, चिकन, मासे आदी वस्तू देखील जिल्ह्यात येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

भाजीपाला आणि फळांची विक्री जिल्ह्यातच व्हावी, अशी देखील व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक गावातून भाजीपाला आणि फळांच्या उपलब्धतेचे आकडे गोळा करण्यात आले. त्यानुसार, पुढील आठवड्याभऱ्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली.

आकडेवारीनुसार, जिल्ह्यात 1958 हेक्टर इतका भाजीपाला लागवड करण्यात आली होती. तर उन्हाळी पिकात 399 हेक्टर इतकी भाजीपाला लागवड झाली आहे. गेल्या आठवड्यातील जिल्ह्यातून आयात आणि निर्यात करण्यात येत असलेल्या भाजीपाला आणि फळे यांच्या आकडेवारीचा अंदाज हा जिल्ह्यासाठी अतिशय सकारात्मक आहे.

अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यात प्रत्येक दिवशी 482 क्विंटल इतका भाजीपाला निर्यात होत आहे. तर त्या तुलनेत लगतच्या या जिल्ह्यातून 240 प्रतिक्विंटल इतक्या भाजीपाल्याची आवक होत आहे. जावक आणि आवक या दोन्हीचा विचार करता तुलनेने वर्धा जिल्ह्यात भाजीपाला पीक हे अधिक आहे. त्यामुळेच जिल्ह्यातून इतर जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात पुरवठा (Wardha District Quarantine) केला जात आहे.

जिल्हा करोनामुक्त ठेवायचा असेल, तर जिल्हा प्रशासनाला कठोर निर्णय घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी निर्णय घेऊन लगेच इतर जिल्ह्यातून येणारा भाजीपाला आणि फळांची आवक थांबवली आहे. याला पर्याय म्हणून जिल्ह्यातून जाणारा माल देखील थांबविण्यात आला आहे. जिल्ह्यात सरप्लस ठरणारा भाजीपाला आणि फळे देखील पुढील काळात जिल्ह्याला वरदान ठरु शकतात. कोरोनाशी दोन हात करायला जिल्ह्यातील शेतकरी बांधव देखील सज्ज झाले आहे.

जिल्ह्यात दररोज होणारी भाजीपाल्याची आवक पाहिली तर नागपूर जिल्ह्यातून 213 क्विंटल इतका भाजीपाला वर्धा जिल्ह्यात पोहोचतो. अमरावती जिल्ह्यातून 17 क्विंटल, यवतमाळ जिल्ह्यातून 10 क्विंटल असा एकूण 267 क्विंटल भाजीपाला जिल्ह्यात पोहोचतो. यात सर्वाधिक आवक कांदा, बटाटा आणि वांगी पिकाचे आहे. तर जिल्ह्यातून नागपूर येथे 267 क्विंटल इतका भाजीपाला विक्रीसाठी जातो. अमरावती जिल्ह्यात 200 क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यात 15 क्विंटल भाजीपाला जातो. तुलनेत वर्धा जिल्हा हा भाजीपाला आणि फळे निर्यात करण्यात आघाडीवर आहे.

टप्प्या टप्प्याने जिल्ह्यात संचारबंदी कठोर करण्यात आली. इतर जिल्ह्याला वेगळे ठेवत हळूहळू वर्धा जिल्हाच क्वारंटाईन (Wardha District Quarantine) होत आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, वरळीत राहणाऱ्या केईएममधील डॉक्टरला कोरोनाची लागण

गुटखा खाऊन पचापचा थुंकला, भाजप नगरसेवकाला पोलिसांनी बदडला

‘लॉकडाऊन’च्या मुदतवाढीचा फैसला ‘या’ दिवशी होणार

Corona : नाशकात कोरोनाचा पहिला बळी, मालेगावात कोरोनाचा शिरकाव

Published On - 11:39 am, Thu, 9 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI