वर्ध्यातील चार अल्पवयीन मुलं बेपत्ता, सेलू पोलिसांत तक्रार

गोविंद हटवार, Tv9 मराठी

|

Updated on: Sep 25, 2022 | 4:08 PM

कामावरून घरी आले तेव्हा त्यांना मुलगा घरी दिसला नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

वर्ध्यातील चार अल्पवयीन मुलं बेपत्ता, सेलू पोलिसांत तक्रार
मसाळा येथील बेपत्ता चार मुलं गेली कुठं?
Image Credit source: t v 9

महेश मुंजेवार, Tv9 मराठी प्रतिनिधी, वर्धा : सेलू तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येतेय. चार अल्पवयीनं मुलं काल घरून बेपत्ता झालीत. याप्रकरणी सेलू पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. पोलीस तपास करत आहेत. रेल्वेस्थानकावर ही मुलं काल संध्याकाळी फिरताना दिसली. ती गांधीधाम एक्सप्रेसमध्ये बसतानाचे फुजेट पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या दिशेनं पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत.

मुलं संध्याकाळी गेलीत, ती परतलीच नाहीत

काल शनिवारची मुलांची शाळा होती. शाळेतून घरी आल्यानंतर पालक शेतात गेले. सकाळी अकरा वाजतानंतर मुलं घरी होती. पालक शेतातून संध्याकाळी घरी आले तेव्हा मुलं दिसून आले नाहीत. त्यामुळं मुलांचा शोध घेण्यात आला. पण, गावात किंवा नातेवाईकांकडे ही मुलं दिसली नाहीत. त्यामुळं पालकांनी सेलू पोलिसांत तक्रार दाखल केली.

पप्पू देवढे (वय 13 वर्ष), राज येदानी (वय 13 वर्ष), राजेंद्र येदानी (वय 12 वर्ष), संदीप भुरानी (वय 8 वर्ष) अशी बेपत्ता मुलांची नाव आहेत. शनिवारी पप्पू देवढे याला शाळेतून सकाळी 11 वाजता त्यांच्या वडिलांनी घरी आणून ते शेतात निघून गेले.

रेल्वेने गेल्याचा पोलिसांचा अंदाज

कामावरून घरी आले तेव्हा त्यांना मुलगा घरी दिसला नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी तक्रारीवरून दाखल केला. पोलिसांकडून मुलांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुजेट तपासले. या फुटेजमध्ये ही मुलं रेल्वेस्थानकावर फिरताना दिसली. अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसमध्ये गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या रेल्वेनं पुढील स्टेशनवर ती गेली असावीत, असा अंदाज आहे.

मुलांना पळवून नेले नाही

वर्धा पोलीस म्हणतात, हा घातपात नाही. किंवा कुणी मुलांना पळवून नेलं नाही. गांधीधाम एक्सप्रेसवर ही मुलं निघून गेली आहेत. रेल्वेस्थानकावर ही मुलं फिरतानाचे फुटेज आहेत. संध्याकाळच्या वेळी ही मुलं या रेल्वेस्थानकावर होती. ती ज्या दिशेनं गेलीत त्या दिनेश पोलीस पथक रवाना झाले आहेत. तपास सुरू आहेत.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI