Kalicharan maharaj : कालीचरणच्या जामीन अर्जावर दोन दिवसांनी सुनवाणी, अजून किती ठिकाणी तक्रारी? वाचा सविस्तर

कालीचरण सराटच्या (kalaicharan maharaj) जामीन अर्जावर दोन दिवसांनी सुनावणी होणार आहे. आज रायपूर येथून कालीचरण महाराजाला वर्धा पोलिसांनी आणत न्यायालयात हजर केले होते.

Kalicharan maharaj : कालीचरणच्या जामीन अर्जावर दोन दिवसांनी सुनवाणी, अजून किती ठिकाणी तक्रारी? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 11:07 PM

महात्मा गांधींबाबत (mahatma gandhi) संतापजनक विधान करणाऱ्या अभिजित उर्फ कालीचरण सराटच्या (kalaicharan maharaj) जामीन अर्जावर दोन दिवसांनी सुनावणी होणार आहे. आज रायपूर येथून कालीचरण महाराजाला वर्धा पोलिसांनी आणत न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने कालीचरण यांना पुन्हा रायपूर येथील कारागृहात पाठविण्यात आले आहे. कालीचरण याला आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी कालीचरणची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केळी होती. यावर आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेत न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. न्यायाधीश श्रीमती एम, वाय, नेमाडे यांनी पोलीस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठाडी सुनावली. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडी मिळताच जामीन अर्ज दाखल केला. दुपारनंतर जामीन अर्जावर दोन दिवसांनी सुनावणी घेण्याचे आदेश न्यायाल्याने दिले.

कालीचरणला जामीन मिळणार?

कालीचरणच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाच्या जवाबसाठी आणि सुनावणीकरिता 14 जानेवारी ही तारीख देण्यात आली आहे. कालिचरणला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने वर्धा पोलिसांनी दुपारी त्याला रायपूर येथील कारागृह प्रशासनाच्या सुपूर्द करण्यासाठी रवाना झाली. 14 तारखेला कालीचरणला जामीन मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कालीचरणचा पुन्हा नवा नारा

पोलिसांच्या वाहनातून महाराजने जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीयेचा दिला नारा दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य करणा-या अभिजित उर्फ कालीचरण सराटवर वर्धा शहर पोलिसात भादवीच्या कलम 153, 502(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालीचरण हे छत्तीसगढ राज्यातील रायपूरच्या सेंट्रल जेलमध्ये या प्रकरणी अटकेत होते. यानंतर त्यांना वर्धा शहर पोलिसांनी काल संध्याकाळी पाच वाजता ताब्यात घेत वर्ध्यात आणले. मध्यरात्री तीन वाजता दरम्यान कालिचरण यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले होते.

कालीचरणविरोधात अनेक तक्रारी

26 डिसेंबरला कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य रायपूरच्या धर्मपरिषदेत केले होते. यानतंर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत रायपूरसह महाराष्ट्राच्या पुणे, वर्धा, अकोला, ठाणे आणि कल्याण येथे महाराजावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात महाराजाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले होते तर आज वर्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज न्यायालयाच्या प्रक्रियेनंतर वर्धा पोलीस आरोपी कालीचरणला पुन्हा रायपूर कारागृहाच्या सुपूर्द करणार आहे. यानंतर अकोला, ठाणे आणि कल्याण पोलीस सुद्धा यांचा ताबा घेणार असल्याची माहिती आहे.

UP Assembly Election 2022 : पाच राज्यातील निवडणुकीवरुन राजकीय आखाडा तापला, चंद्रकांत पाटलांचे पवार, राऊतांना बोचरे सवाल

कोरोना निर्बंध : शाळा, महाविद्यालय, पर्यटनस्थळी कोरोना वाढतो! मग बाजारपेठांमध्ये कोरोना मरतो का?

Video | पर्रीकरांचा मुलगा आहे म्हणून उत्पलला भाजपची उमेदवारी नाही? फडणवीसांचं उत्तर जसच्या तसं

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.