Wardha Suicide : प्रेम केलं, पण संघर्षाला मुकले; प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेत आत्महत्या

Wardha Suicide : प्रेम केलं, पण संघर्षाला मुकले; प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेत आत्महत्या
प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेत आत्महत्या
Image Credit source: टीव्ही 9

महेश शालिक ठाकरे (26) आणि त्याची 15 वर्षीय प्रेयसी दोघेही नागपूरमधील बेला येथील रहिवासी आहेत. अल्पवयीन मुलगी घरातून कुणालाही न सांगता 26 रोजी घरातून निघून गेली होती. ती मृतक महेश ठाकरे याच्यासोबत गेल्याचा घरच्यांना संशय होता. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी बेला पोलिसात याबाबत पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती.

चेतन व्यास

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 29, 2022 | 9:22 PM

वर्धा : प्रेमात वाहून जात आपण काय निर्णय घ्यावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तीक मुद्दा आहे. काही वेळा प्रेम केलं तर संघर्षही अटळ असतो. प्रेमाला विरोध म्हणजे जीवन संपविणे नाही तर संघर्ष करुन लढायला हवं, हे सांगण्यामागचं कारण म्हणजे नागपूर जिल्ह्यातील बेला गावातील रहिवासी अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकरासह वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या कुर्ला गावातील एका शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या (Suicide) केली. त्यांच्या आत्महत्येमागचा एकच उद्देश ते म्हणजे प्रेमाला असलेला घरच्यांचा विरोध. अल्पवयीन मुली (Minor Girl)सह तिचा प्रियकर (Boyfriend) यापूर्वीही पळून गेले होते. त्यामुळे मुलीच्या घरच्यांना महेशवरच संशय असल्याने महेशने मुलीला पळवून नेल्याची तक्रार बेला पोलिसात दाखल केली होती. अखेर दोघांचेही मृतदेहच विहिरीत तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ माजली. (In Wardha, a couple commits suicide by jumping into a well)

कुटुंबीयांच्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाची आत्महत्या

महेश शालिक ठाकरे (26) आणि त्याची 15 वर्षीय प्रेयसी दोघेही नागपूरमधील बेला येथील रहिवासी आहेत. अल्पवयीन मुलगी घरातून कुणालाही न सांगता 26 रोजी घरातून निघून गेली होती. ती मृतक महेश ठाकरे याच्यासोबत गेल्याचा घरच्यांना संशय होता. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी बेला पोलिसात याबाबत पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती. घरच्यांना ही बाब माहिती झाल्याने आता आपल्याला घरचे वेगळे करणार ही भिती दोघांच्याही मनात होती.

कुटुंबियांनी प्रेम आणि लग्नाला विरोध केल्याने आपल्याला भेटता येणार नाही, त्यामुळे विरहाचा त्रास सोसता येणार नाही. या परिस्थितीवर मात करायची असेल तर आत्महत्या करावी, असा भयानक विचार दोघांच्याही मनात आला. दोघांनी त्यांच्या घरच्यांशी संपर्क करुन आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याने आत्महत्या करत आहे, असे सांगितले. घरच्यांनी दोघांचा शोध घेतला असता ते दोघे दुचाकीने कुर्ला गावाकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घरच्यांनी शोध घेतला. कुर्ला गावानजीक जिरा उमरी शिवारात असलेल्या कमलाबाई जनार्धन कावळे यांच्या शेतातील विहिरीत दोघांनीही उडी घेत जीवनयात्रा संपविल्याचे कळले. (In Wardha, a couple commits suicide by jumping into a well)

इतर बातम्या

लायटरच्या जीवावर चोर मांगे More! लायटरसारखी बंदूक ताणून लुटमार करणाऱ्यांना कल्याणमध्ये अटक

Big Breaking : पुण्यातली स्फोटांची मालिका संपेना, चाकण औद्योगिक वसाहतीतही मोठा ब्लास्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें