AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोक्यात हवा जाऊ देऊ नका; …अन् एकनाथ शिंदेंनी आमदार, मंत्र्यांना सुनावलं

गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर आले आहेत, या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या आमदार आणि मंत्र्यांना कानपिचक्या दिल्याचं पाहायला मिळालं.

डोक्यात हवा जाऊ देऊ नका; ...अन् एकनाथ शिंदेंनी आमदार, मंत्र्यांना सुनावलं
Eknath Shinde Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2025 | 10:17 PM
Share

गेल्या काही दिवसांमध्ये  शिवसेनेच्या काही नेत्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी जेवण खराब दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, त्यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली,  हे प्रकरण ताजं असतानाच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा बॅगेसोबतचा एक व्हिडीओ समोर आला, त्या बॅगेमध्ये रोकड असल्याचा आरोप सुरू आहे. दरम्यान या सर्व घटनांनंतर आता उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे हे अ‍ॅक्शनमोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी चांगलंच सुनावलं आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

गेल्या काही दिवसांत काही गोष्टी घडल्या, तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं. तुमचे आमदार काय करतात? असा प्रश्न मला विचारला जातो. तुम्ही सगळी माझी माणसं आहात. आपलं कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे . चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. कमी बोला जास्त काम करा, बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं, असं म्हणत यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. परंतु, मला कारवाई करावी लागणार नाही, तसंच काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी रागावत नाही. मी प्रमुखासारखं वागत नाही. कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्हीही तसंच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे, असंच समजून कामं करा . कमी वेळात जास्त यश मिळालंय. लोकं आपल्या पाठीशी आहे . त्यामुळे बदनामीचे डाव रचले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात. ती काळजी घ्या, असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आणि आमदारांना म्हटलं आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे