Video: मुक्या जीवांचा आकांत! सहकाऱ्याचा अपघाती मृत्यू, वाशिममध्ये वानरांचा रास्ता रोको, पहा ह्रदयद्रावक व्हिडीओ

आपण आपल्या आजूबाजुला नेहमीच बघतो की, माणूस मानसाचा वैरी झाले आहे. तुटपुंज्या पैशांसाठी माणूस एकमेंकांचा जिवावर उठला आहे. आपण नेहमीच ऐकतो की, आता माणूस की जिवंत राहिलेली नाहीये. मात्र, स्वार्थाने बरबटलेल्या या जमान्यात मुक्या पशूप्राण्यांमधील मुक संवेदना आजही जीवंत असल्याचे दिसून आले.

Video: मुक्या जीवांचा आकांत! सहकाऱ्याचा अपघाती मृत्यू, वाशिममध्ये वानरांचा रास्ता रोको, पहा ह्रदयद्रावक व्हिडीओ
वानरांचे रास्ता रोको आंदोलन
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 1:40 PM

मुंबई : आपण आपल्या आजूबाजुला नेहमीच बघतो की, माणूस मानसाचा वैरी झाले आहे. तुटपुंज्या पैशांसाठी माणूस एकमेंकांचा जिवावर उठला आहे. आपण नेहमीच ऐकतो की, आता माणूस की जिवंत राहिलेली नाहीये. मात्र, स्वार्थाने बरबटलेल्या या जमान्यात मुक्या पशूप्राण्यांमधील मुक संवेदना आजही जीवंत असल्याचे दिसून आले. त्याचे झाले असे की, वाशिम जिल्हातील महागाव कारंजा रस्त्यावर अचानक एका गाडीने वानराला (Monkey) धडक दिली.

-साथीदाराच्या मदतीला धावली कळपातील वानेरे 

आपल्यासोबतच्या एका साथीदाराचा अपघात झालेले बघताच मदतीसाठी अनेक वानरे रस्त्यावर आली. इतकेच नव्हेतर त्या वानराला वाचवण्यासाठी इतर सर्व वानरे प्रयत्न करत होती. मात्र, अचानकच त्या वानराने आपला जीव सोडला आणि उपस्थित सर्व वानरांनी रस्ता रोखून ठेवला. हा सगळा प्रकार हृदय हदरवणारा होता. त्यांचं दुःख आणि आक्रोश त्या मुक्या वानरांच्या शरीर हालचालीद्वारे स्पष्ट दिसत होते.

वानरांचा तो कळप मेलेल्या वानराच्या शेजारीच बसून होता. विशेष म्हणजे बिथरलेल्या या वानरांनी चक्क तासभर रास्ता रोको केल्याने बघणाऱ्याचे डोळे देखील पाणावले. वानर हा समूहाने राहणारा प्राणी आहे. तो मानवाप्रमाणे इतरांच्या भावना समजतो, जोपासतो हे वेळोवेळी आढळून आले आहे. याचाच प्रत्यय वाशिम जिल्ह्यात झालेल्या अपघातावरून आला आहे. एका वानराचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर मानवाप्रमाणे त्यांनी  रास्तारोको करीत आपल्या भावना व्यक्त केल्या हे विशेष आहे.

-वाहनाच्या धडकेने वानराचा मृत्यू

दिवसेंदिवस वाढत असलेली वृक्षतोड त्यामुळे जंगल भकास होत चालली आहेत. यामुळे जंगलात चारा पाणी मिळत नसल्याने वन्यप्राणी शहरांकडे वळत आहेत. याच दरम्यान रस्ते ओलांडून जाताना वन्यप्राण्याचे अपघात वाढत आहेत. राज्यातील महामार्गाचे काम जोरात सुरू आहेत. त्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवतात आणि त्यामुळेच वन्यप्राण्याच्या अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे जंगल परिसरात वाहन चालवताना वाहचालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या : 

पुणे जिल्ह्यातील दोन्ही बैलगाडा शर्यतींना परवानगी नाकारली! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

उद्या लांडेवाडीत घुमणार भिर्रर्र … चा आवाज ; बक्षिसाची रक्कम ऐकून व्हाल आवक

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.