‘संतोष देशमुख प्रकरण आम्ही दाबू देणार नाही, समाज आमच्या…,’ काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?

जात प्रमाणपत्रांची वॅलिडिटीसाठी मराठवाड्याला एक अधिकारी दिला आहे,त्यानी अनेक वॅलिडिटी रोखली आहे,त्यावर काय केलंय असा सवाल मनोज जरांगे यांनी केली आहे. सर्व केसेस मागे न घेतल्यास आम्ही मुंबईला जाणार आहोत, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला मुंबईला जावे लागेल. मराठ्याची परीक्षा डबल घेऊ नका, एकदा घेतली आहे असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

'संतोष देशमुख प्रकरण आम्ही दाबू देणार नाही, समाज आमच्या...,' काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 6:21 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरण आम्ही दाबू देणार नाही, समाज आमच्या बाजूने आहे असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे, न्यायासाठी वणवण फिरत आहे.या प्रकरणात लवकरात लवकर अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक व्हायला हवी,हे देशमुख कुटुंब साधंभोळं कुटुंब आहे, पण मी लक्ष ठेवून आहे असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

देशमुख कुटुंबीयांशी माझी आज चर्चा काही नाही झाली, मी दवाखान्यातच होतो, आज सुट्टी झाली आता त्यांची भेट झाली आहे. पण हे प्रकरण आम्ही दाबू देणार नही, समाज पाठीशी आहे असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे कारवाई कधी होईल. उज्वल निकम यांची नियुक्ती झाली का ? मोबाईल कधी मिळणार?, आम्हाला तर शंका आहे धनंजय मुंडेच्या घरी मोबाईल ठेवला का? असा आरोप जरांगे पाटील केला आहे.

फरार आरोपीला मुंडेनी लपवून ठेवला असेल

गाडीवाला कुठं आहे? फरार आरोपी इथंच असायला पाहिजे बीड, नगर, बुलढाणा- सिन्नर या भागात असेल. त्याला धनंजय मुंडे यांनी लपवून ठेवला असेल…गाडीवाला कुठं आहे? देशमुख यांना धमकी देणार कुठे आहेत, घर देणारा, पैसे देणाऱ्यांना सहआरोपी केलं का? असाही सवाल जरांगे यांनी केला आहे. शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या इन्स्पेक्टरची चौकशी झाली का?, डॉक्ट्ररांची चौकशी केली का ? मुख्यमंत्री काय करत आहेत? हे सर्वांना माहित आहे, देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आहे. त्यांचा गैरफायदा घेऊ नका देशमुख कुटुंब भोळभाबडं आहे, आरोपी सुटू देऊ नका असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

फोन धनंजय मुंडेलाच केला का?

करमाड्या ( कराड ) 302 मध्ये आलाय का?, मोक्क्यात आलाय का? , 120 ब मध्ये तो आलाय का?, मला शंका आहे. यामध्ये एका बड्या नेत्याला फोन गेला होता, तो बडा नेता कोण आहे आम्हाला कळू द्या जरा…विष्णू चाटे याने एका बड्या नेत्याला फोन केला होता, मग धनंजय मुंडेलाच केला का? विष्णू चाटेनं जो मोबाईल वापरला, तो मोबाईल कुठं आहे? धनंजय मुंडेचे सीडीआर काढले का? अशी प्रश्नांची सरबत्ती जरांगे यांनी केली आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....