Weather Alert : विदर्भवासियांनो काळजी घ्या, नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात 3 दिवस उष्णतेची लाट!

दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरातील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचलं होतं. अशावेळी आता नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात 3 दिवस मॉडरेट हिट व्हेवचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Weather Alert : विदर्भवासियांनो काळजी घ्या, नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात 3 दिवस उष्णतेची लाट!
नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 6:21 PM

नागपूर : राज्यावर एकीकडे कोरोनाचं संकट अधिक गहिरं होत असताना मार्चमध्येच पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरातील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचलं होतं. अशावेळी आता नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात 3 दिवस मॉडरेट हिट व्हेवचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं बनलं आहे. (3 days heat wave in some districts of Vidarbha including Nagpur)

राज्यात मार्च महिन्यातच उन्हाचे चटके अतिशय तीव्रतेने जाणवू लागले आहेत. विदर्भ, मराठवाडाच्या काही जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. कोकणातही तापमान वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी रत्नागिरीचं तापमानही 40 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं आहे. तिकडे नागपूरसह विदर्भात तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. आज आणि उद्या राज्यात पुन्हा तापमान वाढीची शक्यता नोंदवण्यात आली आहे. विदर्भ आणि विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्यातील काही भागात तापमान वाढीचा अंदाज हवामान खात्याकडून नोंदवण्यात आलाय. काही शहरातील तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

29 तारखेला राज्यातील तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

अकोला – 42.8 अमरावती – 41.8 बुलडाणा – 40 ब्रम्हपुरी – 43.3 चंद्रपूर – 42.8 गडचिरोली – 38 गोंदिया – 40.8 नागपूर – 41.5 वर्धा – 42 वाशिम – 39.2 यवतमाळ – 42.5

दिल्लीतील वारे बदलले!

संपूर्ण देशात तापमान वाढ नोंदवण्यात येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काल दिल्लीत 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. होळी दिवशी म्हणजे 29 मार्चला 1976चं रेकॉर्डही तुटल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर दुसरीकडे 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान पूर्वोत्तर राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Weather Update : राज्यभरात उन्हाचा तडाखा, जळगावात सर्वाधिक तापमान, वाचा कुठे किती तापमान?

राज्यातील तापमानात झपाट्याने बदल; मुंबईत उकडा वाढला, कोकणात पावसाची शक्यता

3 days heat wave in some districts of Vidarbha including Nagpur

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.