Weather Alert : नागपुरासह विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 9 ते 11 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Nagpur unseasonal rains Weather Alert)

Weather Alert : नागपुरासह विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

नागपूर : महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. नागपुराता पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. (Weather Alert Nagpur unseasonal rains with strong winds in Vidarbha)

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

नागपुरातील हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमानात कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. मात्र आजपासून हवेच्या दिशेत बदल होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच येत्या दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 11 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता

नागपूर वेधशाळेने 11 एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 9 ते 11 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात वाढलेल्या तापमानापासून मिळणार थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नागपूर वेधशाळेने हिट वेव्हचा अलर्ट हटवला आहे. 9 ते 11 एप्रिलच्या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज आहे. 9 ते 11 एप्रिल च्या दरम्यान तापमानात घट होऊन विदर्भात ढगांच्या गडगडाट सह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. 9 तारखेला पूर्व विदर्भात तर 10 आणि 11 ला संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पाऊस कुठे होणार?

तर दुसरीकडे पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तापमानदेखील वाढत आहे. पुणे वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवताना झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये ढग साचण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.

(Weather Alert Nagpur unseasonal rains with strong winds in Vidarbha)

संबंधित बातम्या : 

नितीन गडकरींकडून पुणेकरांना गिफ्ट; कात्रज जंक्शनजवळ सहापदरी उड्डाणपूल उभारणार

रुग्णालयात जाण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नाही, मग ‘या’ नंबर ‘वर कॉल करा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI