AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjabrao Dakh : पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रात धुवाधार पाऊस; मान्सूनबाबत गुड न्यूज; पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे, परंतु अजूनही चांगला पाऊस पडलेला नाहीये. सर्वाचं लक्ष आता मान्सूनकडे लागलं आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आता एक गुडन्यूज समोर आली असून, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

Punjabrao Dakh : पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रात धुवाधार पाऊस; मान्सूनबाबत गुड न्यूज; पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
सोमवारपासून राज्यात जोरदार पाऊस Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 20, 2026 | 10:31 PM
Share

राज्यात मान्सून दाखल झाला आहे, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत देशासह राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, परंतु अजूनही मान्सूनने तळ कोकणच सोडलेलं नाहीये. त्यामुळे राज्यातील इतर भागांमध्ये पाऊसच झालेला नाहीये. यंदा जूनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिअल्प पाऊस झाला आहे. पाऊस नसल्याने पेरण्यांना विलंब झाला असून, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र आता ही प्रतिक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) येत्या 25 तारखेपासून राज्यातील विविध भागात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये हळुहळु मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि 25 जून ते 30 जून दरम्यान राज्यात जोरदार पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा देखील मान्सूनबाबत नवा अंदाज समोर आला आहे.

काय आहे पंजाबराव डख यांचा नवा अंदाज?  

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या नव्या अंदाजनुसार उद्या म्हणजे 21 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. मात्र त्यानंतर 22 जून पासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल, मान्सूनच्या पावसाला पूर्व विदर्भाकडून सुरूवात होईल, त्यानंतर हळुहळु मान्सून कोकण आणि मुंबई मार्गे संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. 22 जूनपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल, पुढील काही दिवसांमध्येच आता मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, 22 जून सोमवारपासून ते 30 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.

पुढील आठ दिवसांमध्ये राज्यात चांगला आणि पेरणीयोग्य पाऊस होईल, आणि रखडलेल्या पेरण्या देखील होतील, शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही, असं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. तसचे शेतकऱ्यांनी आधी पेरणी योग्य पाऊस झाला आहे की नाही? याची खात्री करूनच नंतर पेरणी करावी असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

Follow Us
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?