AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert : पावसानंतर दुसरं मोठं संकट, 6 राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात…

महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे, तसेच संपूर्ण उत्तर भारतात लवकरच थंडीची लाट जाणवू शकते. पर्वतांवरील बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये पारा घसरणार असून, महाराष्ट्रातही किमान तापमानात लक्षणीय घट होईल. ४-५ डिसेंबर रोजी पश्चिमी विक्षोभ सक्रिय होऊन बर्फवृष्टी व पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण भारतात 'दिटवाह' चक्रीवादळामुळे पाऊस सुरु राहील. हिवाळा तीव्र होत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आहे.

Weather Alert :  पावसानंतर दुसरं मोठं संकट, 6 राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात…
राज्यात जाणवार थंडीचा कडाका
| Updated on: Dec 04, 2025 | 9:11 AM
Share

Today Weather Forecast : थंडीचे दिवस आले असले तरी महाराष्ट्रात अद्याप हुडहुडी भरवणारी थंडी आलेली नाही, सकाळी गारठा, दिवसा उकाडा असा खेळ सुरू आहे. मात्र आता लवकरच यात बदल होताना दिसणार असून थंडीबद्दल महत्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. पर्वतांमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतात जाणवायला लागला आहे. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात हिवाळा झपाट्याने वाढत आहे.पुढील 10 दिवसांत, हरियाणा ते बिहारपर्यंत सुमारे 6 राज्यांमध्ये थंडीची लाट असल्याने किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण भारतात ‘दिटवाह’ चक्रीवादळ कमकुवत झाल्यामुळे, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये गडगडाटी वादळासह मध्यम ते मुसळधार पाऊस सुरूच राहील. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने घसरत आहे. ही थंडी अधिक वाढणार असून राज्यातही थंडीची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पर्वतांवर मोठ्या बर्फवृष्टीचा इशारा

जम्मू आणि काश्मीरच्या उंच भागात बर्फ आणि धुक्याची चादर पसरली आहे. हवामान खात्याच्या मते, 4 आणि 5 डिसेंबर रोजी एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होईल.यामुळे हवामान आणखी बिघडू शकते. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागातही अशीच हवामान परिस्थिती दिसून येईल. हिमवर्षाव आणि डोंगराळ भागात थंडीची लाट यामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये हिवाळा अधिक तीव्र होईल.

उत्तर प्रदेशात दिवसा सौम्य, उबदार सूर्यप्रकाश पडत आहे, जो आल्हाददायक आहे, परंतु संध्याकाळ जवळ येताच थंडी वाढू लागते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यातही थंडीची लाट कायम राहील. यामुळे किमान तापमानात लक्षणीय घट होईल. बहुतेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तर कमाल तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील अशी अपेक्षा आहे. आग्रा, टुंडला, इटावा, कानपूर, बाराबंकी, मुझफ्फरनगर सारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

राजस्थामध्येही थंडीची लाट

राजस्थानातील अनेक भागात रात्रीच्या तापमानात झपाट्याने घट झाली, अनेक भागात पारा 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाला. हवामान खात्याच्या अहवालानुसार, मंगळवारी रात्री फतेहपूर (सिकर) आणि लुणकरनसर (बिकानेर) येथे सर्वात कमी 3.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने पुढील काही दिवस अशीच थंडी राहण्याची आणि आज, गुरुवारपासून जयपूर आणि बिकानेर विभागात थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे बिहारमध्येही तापमान झपाट्याने कमी होत आहे. सकाळी ग्रामीण भागात दाट धुके असल्यामुळे अनेक गाड्या वेळेवर धावणे कठीण ठरत आहे. पर्वतांवर होणाऱ्या पश्चिमी विक्षोभाचा राज्यावरही परिणाम होईल. यामुळे येत्या काही दिवसांत किमान आणि कमाल तापमानात घट होईल, ज्यामुळे रहिवाशांना तीव्र थंडीच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.