AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Forecast: महाराष्ट्रात संततधार सुरुच राहणार, उत्तर कोकणाला ऑरेंज अलर्ट

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसाची संततधार कायम राहणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितलं आहे.

Weather Forecast: महाराष्ट्रात संततधार सुरुच राहणार, उत्तर कोकणाला ऑरेंज अलर्ट
बेळगावमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळून पाच जण ठार
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 2:24 PM
Share

मुंबई: प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसाची संततधार कायम राहणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज आणि उद्या सुद्धा पाऊस होईल. 24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, हवामान विभागानं आज रायगड, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला असून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेले पावसाचे इशारे

पालघरमध्ये संततधार

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार कायम असून पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणक्षेत्रात पाणी साठ्यात वाढ झाली आहे. पालघर ,  मनोर , बोईसर ,  डहाणू , तलासरी भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने सुर्या नदीवरील धामणी धरण 100 टक्के भरले असून धरणाचे 5 वक्रीदरवाजे 60 सेमी ने उघडण्यात आले आहे.तर धरणाखालोखाल असलेला कवडास उन्नती बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. यामुळे सुर्या नदीत 12 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून सुर्या नदीला पूर आला आहे. पावसाची संततधार कायम असून पावसामुळे भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हाती आलेले भात पिकांना मुसळधार पावसाने पाण्यात खराब होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

वसई विरारमध्ये रिमझिम पाऊस

वसई विरार नालासोपारा मध्ये रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. परिसरामध्ये पूर्णपणे काळेकुट्ट आभाळ झाले असून वातावरण ढगाळ झाले आहे. आज दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील सखल भागात कुठेही पाणी साचलेले नाही.

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असल्याचं स्कायमेटचे महेश पुलावत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 23 सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या:

Vidarbha Rain : भंडाऱ्यातील मोहाडी शहरात पाणी साचलं, चंद्रपुरात मुसळधार पावसानं दाणादाण

Weather Forecast : कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो ॲलर्ट जारी

Weather Forecast IMD issue rain fall alert in Maharashtra mostly rain in Norht Kokan including Palghar Raigad and Ratnagiri

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.