नागपूरसह विदर्भाच्या काही भागात 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता!

नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील धरणं भरली असल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

नागपूरसह विदर्भाच्या काही भागात 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता!
नागपूर धरण (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 3:12 PM

नागपूर : विदर्भवासिय आणि नागपूरकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील धरणं भरली असल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदी किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर धोकादायक ठिकाणं किंवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका, असं आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. (Warning of heavy rains in next 2 days in some parts of Vidarbha including Nagpur)

गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील धरणे बऱ्यापैकी भरलेली आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 2 दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.

नागपूर जिल्ह्यातील मोठ्या धरणांची स्थिती : (दिनांक 20 सप्टेंबर 2021)

तोतलाडोह (रामटेक) – 86 टक्के नवेगाव खैरी (पारशिवानी) – 79 टक्के वडगाव धरण (उमरेड) – 94 टक्के नांद धरण (उमरेड) – 76 टक्के

नागपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची स्थिती

वेणा, नागपूर : 100 टक्के कान्होलीबारा, हिंगणा : 100 टक्के पांढराबोडी, उमरेड : 100 टक्के मकरधेाकडा,उमरेड : 46 टक्के सायकी, उमरेड : 96 टक्के चंद्रभागा, काटोल : 100 टक्के मेारधाम, कळमेश्वर : 100 टक्के केसरनाला, कळमेश्वर : 100 टक्के उमरी, सावनेर : 100 टक्के कोलार, सावनेर : 100 टक्के खेकरानाला, सावनेर : 96 टक्के जाम, काटोल : 100 टक्के

वरील 100 टक्के भरलेल्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून अल्प प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन

धरणात क्षेत्रात पडणारा पाऊस आणि आजू-बाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा आवक्यामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता, दरवाजे असणाऱ्या मोठ्या धरणाचे वक्र दरवाजे कधीही उघडण्यात येवू शकतात. तर दरवाडे नसणाऱ्या धरणातील पाणीसाठा 100 टक्के पेक्षा जास्त झाल्यावर नदी/ नाल्यातुन पुराचे पाणी वाहणार आहे. त्यामुळे करीता नदी काठावरील सर्व नागरिकांनी/ शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसंच जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना आणि नदी पात्रातून आवागमण करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वत:ची काळजी बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

?कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका

? नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा

? मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.

? जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका.

? नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.

? अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका

? धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका

आपत्ती काळात संपर्क :

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर – 0712-2562668, टोल फ्री क्र. 1077

इतर बातम्या :

‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात!’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी : सोयबीनच्या दरात झपाट्याने घसरण, शेतकऱ्यांचे लक्ष लातुरच्या बाजारकडे

Warning of heavy rains in next 2 days in some parts of Vidarbha including Nagpur

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.