AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा भाजपने कायम राखली.. सुवेंदू अधिकारींच्या मुख्यमंत्रीपदावरून राऊतांचा सणसणीत टोला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. राऊत यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत, भाजप भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देत असल्याची टीका केली.

Sanjay Raut : भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा भाजपने कायम राखली.. सुवेंदू अधिकारींच्या मुख्यमंत्रीपदावरून राऊतांचा सणसणीत टोला
संजय राऊतImage Credit source: TV9
| Updated on: May 09, 2026 | 10:50 AM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 में रोजी, सोमवारी लागले आणि भाजपला तिथे न भूतो न भविष्यी असं दणदणीत यश मिळालं. ममता बॅनर्जींचा, त्यांच्या तृणमूल काँग्रेसचा सणकून पराभव झाला आणि आता पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता येत आहे. आज भाजप सरकारचा शपथविधी सोहळा असून राजधानी कोलकाता येथे सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी पार पडणार असून या समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य व देशातील अनेक महत्वाचे नेतेही या शपथविधी सोहळ्यास हजेरी लावणार आहेत.

मात्र याच शपथविधीवरून आणि भाजपच्या सत्तास्थापनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा भाजपने कायम राखली आहे, त्याबद्दल, त्या कनिस्ट्न्सीबद्दल त्यांच अभिनंदन केलं पाहिजे, असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी लगावला.

काय म्हणाले राऊत ?

भारतीय जनता पक्षाने आपल परंपरा कायम राखली आहे. अत्यंत भ्रष्ट अशा व्यक्तीला मंत्रीपदी किंवा मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम ठेवल. 2020 च्या दरम्यान एक स्टिंग ऑपरेशन झालं आणि तृणमूल काँग्रेसच्या 5 खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आलं. त्यांच्यामध्ये सुवेंदू अधिकारी होते. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्राने टाकल्या. या धाडी टाकायला सुरूवात झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी हे भाजपात सामील झाले. आणि आज ते मुख्यमंत्री बनत आहेत, अस संजय राऊत यांनी नमूद केलं.

तो डाग अजूनही कायम

पण आजही आपण पाहिलं तर, थोड्या वेळा मी तो व्हिडीो टाकणार आहे. पण भाजपचे नेते असलेले सुवेंदू अधिकारी, बंगालचे मुख्यमंत्री बनणारे सुवेंदू अधिकारी हेआजही,  अजूनही त्या वॉशिंग मशीनमध्येच फिरत आहेत. तो डाग अजूनही स्वच्छ झालेला नाही. ते सरळ असे पैसे स्वीकारतात. अशा माणसाला राज्याचं मुख्यमंत्री पदत देत आहेत . भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा राखली, त्यांच्या या कन्सिस्टन्सीचं अभिनंदन केलं पाहिजे, असा सणसणीत उपरोधिक टोला संजय राऊत यांनी हाणला.

Follow Us
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!