AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेबाची कबर…करणारे कधीच सांगत नाहीत, काय म्हणाले मनोज जरांगे ?

कोरटकर याने मराठ्यांना धमकी दिली आहे, तर याला का जेलमध्ये टाकत नाहीत ? तुम्ही तुमचे सगे सोयरे यांना वाचवता का ? असा सवाल करत शिरूर प्रकरणावर देखील कारवाई करावी ( खोक्या ) असेही जरांगे यावेळी म्हणाले. हरणाची शिकार करीत असतील तर सरकारने कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

औरंगजेबाची कबर...करणारे कधीच सांगत नाहीत, काय म्हणाले मनोज जरांगे ?
manoj jarang patil
| Updated on: Mar 08, 2025 | 12:41 PM
Share

मोठे मोठे लोक बोलले तर काय बोलणार? फेका मग बोलायची काय गरज आहे ? कबरीला संरक्षण तुम्हीच देताय आणि पैसेही देताय तुम्हीच. ते बोलले म्हणजे देशच बोलला आहे. औरंगजेब हा नालायक होता. पिव्वर नालायक होता. येताना त्याने आमची मंदिरं पाडली. ती पैदास काय चांगली होती का? औरंगजेबाची कबर काढायची तर काढा. करायचे ते करतात.बाबरी मशीदचं काय केलं? करणारे कधीच सांगत नाहीत अशी प्रतिक्रीया मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

अधिवेशन झाल्यावर आपण शांत बसणार नाही.सर्वांना प्रमाणपत्र देण्यात यावेत. शिंदे समिती काम करीत नाही.उपोषण सोडताना गुन्हे मागे घेऊन म्हणाले होते. मात्र गु्न्हे काही मागे घेतलेले नाही. सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी काढावा. वारंवार सांगत आहोत आमदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून कुणबी प्रमाणपत्र लागू करावे.कोणत्याही पक्षाचे असो मराठा आमदारांनी हा मुद्दा लावून धरावा असेही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

हा व्हिडीओ कुठला आहे, शोधावे

हा व्हिडीओ कुठला आहे, हा पोलिसांनी तपास करून शोधायला हवं,ज्या जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे तेथील SP वर संशय निर्माण होईल असे वागू नये,याचे उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी कैलास बोराडे याच्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात जरांगे पाटील यांनी केली आहे. व्हिडिओ संदर्भात कारवाई केली का ? पालकमंत्र्यांनी याची काही माहिती घेतली का ? धर्म,देव आणि महापुरुष यापलीकडे गढूळ व्यक्तींना जातीवादाचं वेड लागले आहे.सरकारकडून पडताळणी झाल्यावर मी नाव घेईल. प्रशासनाची खात्रीशीर अधिकृत माहिती आल्यावर सांगेल.तोच व्यक्ती प्रामाणिकपणे सांगेल.महादेव भक्त स्वतः कबूल करतो.माहिती समोर न आल्यास पालकमंत्री अडचणीत येणार. पालकमंत्री यांनी पडताळणीवर दबाव आणला असे म्हणता येईल. जिल्ह्याचा पालकमंत्री या फेऱ्यात येईल असेही जरांगे म्हणाले.

भुजबळ हा सडलेल्या डोक्याचा

छगन भुजबळ हा सडलेल्या डोक्याचा आहे. यांच्या डोक्यात फक्त जातीभेद आहे. सगळ्यांनी मिळून चुकणाऱ्यांचे कान मारायचे.गुन्हे करणारा तो आपला बाब्या असे सुरु आहे. छगन भुजबळ यांचे जातीवादीचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही.स्वप्न बघून मरशील पण स्वप्न पूर्ण होणार नाही. छगन भुजबळ सारख्या जातीय लोकांनी वाद घडवून आणले आणि आता किनाऱ्यावर बसून ते पाहत बसले आहेत अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.