AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli : ग्रामीण भागातील शिक्षणाचे वास्तव काय? अन् म्हणे डिजिटल इंडिया..!

ग्रामीण भागात मूलभूत सोई-सुविधा पोहचल्या आहेत का नाहीत हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. सोई-सुविधांअभावी हजारो विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत.

Sangli : ग्रामीण भागातील शिक्षणाचे वास्तव काय? अन् म्हणे डिजिटल इंडिया..!
शिक्षणाचे धडे घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 21 किमीचा प्रवास करावा लागत आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 19, 2022 | 7:14 PM
Share

सांगली : काळाच्या ओघात शिक्षण (Education) पद्धतीमध्ये बदल होत आहे. शिवाय गेल्या दोन वर्षात होत असलेला बदल अनुभवयासही मिळाला पण तो शहरी विद्यार्थ्यांपूरताच मर्यादित राहिला. शहरी भागात शिक्षण क्षेत्रात डिजिटलाइजेशन (Digital) होईलही पण ग्रामीण भागाचे काय? असा प्रश्न कोल्हापुरातल्या (Kolhapur) अंबाई धनगरवाडी येथील विद्यार्थ्यांची व्यथा पाहिल्यावर नक्कीच पडेल. येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी तब्बल 21 किमीचा प्रवास करावा लागत आहे. या धनगरवाडीत अजूनही एसटी ही पोहचलेलीच नाही. त्यामुळे गावच्या 30 विद्यार्थ्यांना दररोज 4 तास पायपीट केल्यानंतर ज्ञानार्जनाचे धडे मिळतात हे आहे वास्तव.

कोरोना काळात सर्वाधिक परिणाम झाला तो शिक्षण क्षेत्रावर. आता ऑफलाईन पद्धतीनचे शाळा सुरु झाल्या आहेत. पण धनगरवाडीतील विद्यार्थ्यांना या ऑफलाईन पद्धतीनेही शिक्षण घेण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते.

देशात यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले आहे. मात्र, हे करीत असताना ग्रामीण भागात मूलभूत सोई-सुविधा पोहचल्या आहेत का नाहीत हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. सोई-सुविधांअभावी हजारो विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाई धनगरवाडी ते सांगली जिल्ह्यातील शिराळा हे 21 किमीचे अंतर पायी पार केल्यावर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते. आजच्या युगात शिक्षणाशिवाय काहीच नाही असे म्हटले जात असले तरी शिक्षण एवढे असह्य असते का असाच सवाल पडत आहे.

अंबाई धनगरवाड्यातील 30 विद्यार्थी हे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी सांगलीच्या वापणावती हुतात्मा नरग येथे 10 किमी अंतर पायपीट करुन येतात. शिवाय हे एक दिवसाचे नाही. शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांची सोय करण्याची मागणी होत आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून अंबाई धनगरवाडी येथे रस्त्याचे डांबरीकरणही झाले आहे. त्यामुळे एसटी वाहतूकीस कोणतीही अडचण नाही. पण या वाडीच्या रस्त्यावरुन अद्यापही बस ही धावलेलीच नाही. त्यामुळे विद्यार्थांचे स्वप्नही साकार होणार की नाही असे प्रश्न निर्माण होत आहेत.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?