AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Monsoon Update : हवामान विभागाकडून मान्सून बाबत मोठी गुड न्यूज, नवा अंदाज काय? टेन्शन मिटलं

उन्हाळा आता संपत आला आहे, सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे मान्सूनचे, भारतामध्ये मान्सून कधी दाखल होणार? याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून मोठी बातमी समोर आली आहे.

IMD Monsoon Update : हवामान विभागाकडून मान्सून बाबत मोठी गुड न्यूज, नवा अंदाज काय? टेन्शन मिटलं
देशात मान्सूनचं आगमन कधी?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 25, 2026 | 5:57 PM
Share

भारतामध्ये मान्सून कधी दाखल होणार? याची सर्वजण अतुरतेनं वाट पाहत आहेत. भारत हा कृषीप्रधान देश असून, भारतामधील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, त्यामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे देखील मान्सूनच्या भारतामधील आगमनाकडे लागले आहेत. गेल्या वर्षी देशासह राज्यात वेळेच्या आधीच मान्सून दाखल झाला होता. मान्सूनचं प्रमाण देखील चांगलं होतं, गेल्या वर्षी अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसला होता. दरम्यान मान्सून संदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता लवकरच भारतात मान्सूनची एन्ट्री होण्याची शक्यात आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची भारताच्या दिशेनं वेगानं आगेकूच सुरू आहे. याही वर्षी वेळेच्या आधीच मान्सून भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे मोठे ढग वेगाने तयार होण्यास सुरुवात झाली आहे. उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.  मान्सूनच्या मोठ्या ढगाची वाटचाल भारतीय किनारपट्टीच्या दिशेनं सुरू झाली आहे. अरबी समुद्रात देखील मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे.

मान्सूनचं आगमन कधी? 

दरम्यान यावर्षी देखील वेळेपूर्वीच मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन लवकरच होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांमध्ये केरळ, कर्नाटक आणि लक्ष्यद्विपमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

यंदा अल निनोचं सावट 

मात्र दुसरीकडे एक चिंताजनक बातमी म्हणजे यंदाच्या मान्सूनवर अल निनोचं सावट असणार आहे. अल निनोमुळे यंदा देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अल निनोमुळे केवळ भारतामध्येच नाही तर जागातील अनेक देशांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत सरकारसह महाराष्ट्र सरकारने तयारी सुरू केली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ