चुकतं तेव्हा दिलगिरी व्यक्त करून पुढं जायचं असतं, त्यातून कुणाचं काही बिघडत नाही, अजित पवार असं का म्हणाले?

माझ्याकडून अशी चूक व्हायला नको. परंतु, बोलण्याच्या ओघात हे झालं. चूक लक्षात आल्यानंतर दिलगिरीपण व्यक्त केली.

चुकतं तेव्हा दिलगिरी व्यक्त करून पुढं जायचं असतं, त्यातून कुणाचं काही बिघडत नाही, अजित पवार असं का म्हणाले?
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 6:12 PM

बारामती : बारामती राष्ट्रवादीमय झाल्याचं म्हणताच अजित पवार म्हणाले, बारामती राष्ट्रवादीमय कधी नव्हती. सरपंच हे गावाचे नेतृत्व करतात. लोकांनी त्यांना निवडून दिलं. लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीला मान-सन्मान मिळाला पाहिजे. गेली ३२ वर्षे त्यांचं प्रतिनिधीत्व करतोय. आमदार या नात्यानं त्यांची काही काम असतात. नवीन निवडून आलेल्या सरपंचांची कार्यशाळा घेण्यात येत आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची काम कोणती असतात. कोणत्या कामासाठी कोणाला पाठपुरावा केला पाहिजे. यासाठी नवीन कार्यकर्त्यांनी पुढं आलं पाहिजे, असंही अजित पवार सांगितलं.

नवीन लोकांनी गावाचं कारभारी पद सांभाळलं पाहिजे. कोणीही निवडून आला तरी आम्ही गटा-तटात जात नाही. जो निवडून येतो त्याला आम्ही मदत करतो. गावाच्या विकासात हातभार लावतो. ही शरद पवार यांची पद्धत आम्हीपण पुढं चालविली आहे, असंही अजित पवार यांनी म्हंटलंय.

काल बोलण्याच्या ओघात चूकभूल होते. पण, अलीकडं इलेक्ट्रॉनिक मीडिया याचा गवगवा करते. टीव्ही 9 नं ते सारखं दाखविलं होतं. अजित पवार सावित्रीबाई फुले यांना सावित्रीबाई होळकर म्हणाले. सावित्रीबाई होळकर हे चुकून बोललो. त्यात असा काय गु्न्हा केला होता. असं काय आकाश पाताळ एक झालं.

मी अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे. माझ्याकडून अशी चूक व्हायला नको. परंतु, बोलण्याच्या ओघात हे झालं. चूक लक्षात आल्यानंतर दिलगिरीपण व्यक्त केली. आपलं चुकत तेव्हा दिलगिरी व्यक्त करून पुढं जायचं असतं. त्यातून कुणाचं काही बिघडत नाही. असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. त्यावर अजित पवार म्हणाले, मला त्याबद्दल काही माहिती नाही. तुम्हीच पोलिसांना विचारा. त्यांना वाटलं असेल माझ्यावर कुणीतरी हल्ला करणार म्हणून वाढ केली असेल. मला काही माहिती नाही. मी बारामतीचा आहे. बारामती माझी आहे. मी येणार लोकांमध्ये मिसळणार माझं काम करणार, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.