AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवीच्या बाळाचा ताबा कोणाकडे? राज्य सरकारचा मोठा निर्णय!

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचं संगोपन कोण करणार? तिच्या बाळाचा ताबा कोणाकडे असणार असा प्रश्न निर्माण झाला होता? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

वैष्णवीच्या बाळाचा ताबा कोणाकडे? राज्य सरकारचा मोठा निर्णय!
| Updated on: May 30, 2025 | 6:59 PM
Share

पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती, नणंद, सासू, सासरा आणि दीर यांना अटक केली आहे. मात्र वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचं संगोपन कोण करणार? असा प्रश्न होता, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याची आजी व वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केलं आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

‘पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.

यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे यांचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती  कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल.’  असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

16 मे रोजी पुण्यातील वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आम्हत्या केली, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती, दीर, सासू, ससार आणि नणंद यांना अटक केली आहे. त्यापैकी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे हे पोलीस कोठडीत आहेत.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा