200 वर्षात जे जमलं नाही ते महाराष्ट्राच्या 19 वर्षाच्या मुलाने काशीमध्ये करुन दाखवलं? कोण आहे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे? मोदींकडून कौतुक
महाराष्ट्रातील छोट्याशा गावातून येणाऱ्या महेश रेखेचा काशीपर्यंतचा प्रवास आणि वेदमुर्तीची उपाधी मिळवणं हा एक मोठा प्रवास आहे. महेश रेखेचा जन्म महाराष्ट्रात अहिल्यानगरमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला.

उत्तर प्रदेशात काशी येथे संस्कृत,वेद आणि शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून विद्यार्थी येतात. इथे महाराष्ट्रातून गेलेल्या एका मुलाने दंड कर्म पारायणाचा अभ्यास पूर्ण केला. 200 वर्षात पहिल्यांदा शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनी शाखेचा संपूर्ण एकाकी कंठस्थ दंडक्रम पारायण पूर्ण झालं. देवव्रत महेश रेखे असं या मुलाचं नाव आहे. तो अवघ्या 19 वर्षांचा आहे. हे अत्यंत कठीण पारायण मानलं जातं. म्हणूनच महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा रहिवासी असलेल्या महेश रेखे याचं स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. महाराष्ट्रातून काशी येथे अभ्यासासाठी गेलेल्या 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे या मुलाने मोठा कारनामा केलाय. देवव्रत महेश रेखेने दंड कर्म परायण पूर्ण केलय. देवव्रत महेश रेखे सांगवाद विश्वविद्यालय वाराणसीचा विद्यार्थी आहे. त्याने दंड कर्म पारायणाचा दररोज अभ्यास करुन हे यश मिळवलं. आतापर्यंत फक्त काही लोकांनाच हा दंड कर्म पारायणाचा अभ्यास पूर्ण करता आलाय.
महाराष्ट्रातील छोट्याशा गावातून येणाऱ्या महेश रेखेचा काशीपर्यंतचा प्रवास आणि वेदमुर्तीची उपाधी मिळवणं हा एक मोठा प्रवास आहे. महेश रेखेचा जन्म महाराष्ट्रात अहिल्यानगरमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला. महेश रेखेचे वडिल चंद्रकांत रेखे मोठे विद्धान आहेत. महेश रेखेचे पहिले गुरु तेच आहेत. महेश रेखेने वयाच्या 5 व्या वर्षापासून वेद मंत्रांच उच्चारण सुरु केलं.
वेदमुर्ती कोण असतं?
दंड कर्म पारायणात यजुर्वेदाच्या मंत्रांचा विशेष विधिने पाठ केला जातो. यात पदं सरळ आणि उल्टी करुन वाचली जातात. हे 2000 मंत्रांचं एक कठीण पारायण आहे. असं म्हणतात की, यजुर्वेदाचे मंत्र वाचण्याची एक विशिष्ट पद्धत असते. देवव्रत रेखेने हे दंड कर्म पारायण पूर्ण केलय. हे पारायण पूर्ण केल्यानंतर 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे वेदमूर्ती बनला आहे. देवव्रत महेश रेखेला वेदमूर्तीची उपाधी देण्यात आली आहे. वेदमुर्ती ते असतात, ज्यांना वेदांच ज्ञान असतं.
याआधी महाराष्ट्रातील माणसानेच केलेला असा कारनामा
देवव्रत वेदमूर्ती महेश रेखेने दंड कर्म पारायण पूर्ण करण्याचा कारनामा 200 वर्षानंतर केला आहे. महेश रेखेने 2 ऑक्टोंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत काशीच्या रामघाट येथील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात दररोज 50 दिवस सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत शुक्ल यजुर्वेदाचे जवळपास 2000 मंत्रांचं दंडक्रम पारायण केलं. 200 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातीलच नाशिक येथील वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी देवदंड कर्म पारायण केलं होतं.
