Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत करुणा शर्मा? त्यांचा धनंजय मुंडेंशी काय संबंध?

मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

कोण आहेत करुणा शर्मा? त्यांचा धनंजय मुंडेंशी काय संबंध?
Dhananjay Munde and Karuna SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 06, 2025 | 2:51 PM

वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. या निकालानंतर करुणा शर्मा आहेत तरी कोण आणि त्यांचा धनंजय मुंडे यांच्याशी नेमका संबंध काय, याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. तर करुणा शर्मा हे नाव जानेवारी 2021 मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. त्यापूर्वी या नावाची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा होती.

मुंबईतल्या एका महिलेनं धनजंय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेलं नातं उघड केलं होतं. “करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत माझे 2003 पासून परस्पर संमतीने संबंध आहेत. माझ्या कुटुंबीयांना, पत्नीला आणि मित्र परिवारालाही याबद्दलची माहिती आहे. परस्पर संमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर आणि इतर सर्व कागदपत्रांवर पालक म्हणून माझंच नाव आहे. ही मुलं माझ्यासोबतच राहतात. माझ्या कुटुंबीयांनी, पत्नीने आणि माझ्या मुलांनीही त्यांना कुटुंबीय म्हणून स्वीकृती दिली आहे”, असं त्यांनी लिहिलं होतं.

कोण आहेत करुणा शर्मा?

करुणा शर्मा या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून त्या मुंबईत राहतात. मुंबईतील ‘जीवनज्योत’ या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित असल्याचं त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं आहे. सामाजिक कार्य करतानाचे त्यांचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर पहायला मिळतात. करुणा शर्मा यांच्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी आपलं नाव ‘करुणा धनंजय मुंडे’ असं लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम देखभालीसाठी रक्कम देणेबाबत आहे. जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे. कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतः ते करुण शर्मा आणि मुलं यांच्याबरोबर लिव्ह इनमध्ये असल्याची यापूर्वीच कबुली दिली आहे, तोच या आदेशाचा आधार आहे.

'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले.
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.