AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तीन बड्या नेत्यांचा आग्रह अन् मंत्रिपद मिळालं, भुजबळांनी थेट नावच घेतलं

नाशिकमध्ये मला विशेष प्रेम दिलं जात.  मी नाशिकच्या लासलगाव, येवला या मतदार संघातून निवडून येतो. मागील काळात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

या तीन बड्या नेत्यांचा आग्रह अन् मंत्रिपद मिळालं, भुजबळांनी थेट नावच घेतलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 22, 2025 | 3:25 PM
Share

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुतीचा राज्यात तब्बल 232  जागांवर विजय झाला तर दुसरीकडे महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, दरम्यान राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती, तर काही अनुभवी चेहऱ्यांना डावलण्यात आलं होतं. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेळ होता. मंत्रिपद न मिळाल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती.

अखेर आता पुन्हा एकदा भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे, भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान त्यांनतर त्यांनी काही गौप्यस्फोट देखील केले आहेत.  मागच्या मंगळवारी आमची बैठक झाली आणि तेव्हाच ठरलं होतं की शपथ घ्यायची आहे, पण मी कोणालाच नाही सांगितलं, असा गौप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावेळीच सांगितलं होतं की दुरुस्त करायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं.

दरम्यान छगन भुजबळ यांना आता मंत्रिपद मिळालं आहे, त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर देखील यावेळी भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पालकमंत्री नसलो तरी काम करण्याची माझी तयारी आहे, मी पालकमंत्री असलो नसलो तरी काही फरक पडणार नाही.  मी नाशिकचा बालक आहे,  पालक नसलो तर काय झालं? पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

तसेच  नाशिकमध्ये मला विशेष प्रेम दिलं जात.  मी नाशिकच्या लासलगाव, येवला या मतदार संघातून निवडून येतो. मागील काळात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली, असंही भुजबळ यांनी म्हटलं.

Follow Us
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?