छगन भुजबळ यांना त्यांचा आताच पुळका का आला? मनोज जरांगे यांचा पलटवार

Manoj Jarange Patil | छगन भुजबळ यांनी हिंगोलीत एल्गार केल्यानंतर, त्यावर मनोज जरांगे यांनी पुन्हा जोरदार हल्लाबोल केला. बीड जिल्ह्यातील हिंसाचाराप्रकरणी छगन भुजबळ यांना आताच का पुळका आला, असा सवाल त्यांनी केला. गेल्या एक महिन्यापासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात विस्तव पण जात नाही. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघे सोडत नाही.

छगन भुजबळ यांना त्यांचा आताच पुळका का आला? मनोज जरांगे यांचा पलटवार
manoj jarange patil and chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 4:30 PM

छत्रपती संभाजीनगर | 26 नोव्हेंबर 2023 : हिंगोलीत छगन भुजबळ यांनी पुन्हा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांचं बीडमधील घरं जाळण्यात आले होते. तसेच येथील हॉटेल जाळण्यात आले होते. छगन भुजबळ त्यावेळी बीडमध्ये त्यांच्या भेटीला गेले होते. मराठा आंदोलकांनी घरं जाळण्याचा आरोप करण्यात आला होता. तोच मुद्दा भुजबळ यांनी हिंगोलीतील ओबीसी मेळाव्यात उचलून धरला. भुजबळांना आताच त्यांचा पुळका का आला असा खडा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्यावर भुजबळ यांच्यावर पलटवार केला.

भुजबळ यांना फायदा घ्यायचा आहे

भुजबळ यांना आताच जयदत्त क्षीरसागर यांचा पुळका का आला असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. भुजबळांना दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे. त्यांना सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे. त्यांना राजकारण करायचे आहे. त्यातून फायदा घ्यायचा आहे, असा प्रतिवार जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केला. क्षीरसागर यांनी हल्ला करणारे मराठे नसल्याचे सांगितले आहे, याची त्यांनी आठवण करुन दिली.

हे सुद्धा वाचा

मग भुजबळ अंतरवाली सराटीत का आले नाहीत

भुजबळ यांनी मराठा नेते क्षीरसागर यांना भेटायला गेले नाहीत. उलट संदीप क्षीरसागर हे रोहित पवार यांना भेटायला छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले, असे सांगितले. त्यावर आपण कधीच बीडमधील जाळपोळीचं समर्थन केलं नाही, असे जरांगे यांनी सांगितले. पोलिसांनी अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांवर, आंदोलकांवर लाठीहल्ला केला त्यावेळी भुजबळ अंतरवाली सराटीत का आले नाही, असा सवाल त्यांनी केला.

ते जुनाट नेता

भुजबळ हे जुनाट नेता असल्याचा टोला मनोज जरांगे पाटील यांनी हाणला. भुजबळांचे केस पांढरे झाले तरी काय? त्यांच्या मनात एकाच समाजाविषयी, मराठा समाजाविषयी राग असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. ते मराठा समाजाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात असल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

धनाजी-संताजीसारखा मीच दिसतो

भुजबळांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. भुजबळ हे मंत्री आहेत. अभ्यासू आहेत. पण त्यांचे वय झाले आहेत. ते जुनाट नेते झाल्याचा टोला त्यांनी लगावला. भुजबळांना धनाजी-संताजीसारखा मीच दिसत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. भुजबळांच्या जोडण्याच्या सल्ल्याचा पण त्यांनी समाचार घेतला. मराठा समाजाच्या हक्काचा आरक्षणाचा फायदा आताापर्यंत लाटला आणि आता जोडण्याची भाषा करु नका. आता मराठा तुमचे ऐकणार नाहीत, असे म्हणणे त्यांनी मांडले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.