ऐन थंडीच्या दिवसांत का लागतेय आग? वाचा सविस्तर

ऐन थंडीत वारंवार आग लागत असल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. कारण, यामुळे मोठी जीवितहानी होण्याचा धोका आहे.

ऐन थंडीच्या दिवसांत का लागतेय आग? वाचा सविस्तर
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 1:27 PM

मुंबई : राज्यात एकीकडे कडाक्याची थंडी असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये धुळे, पुणे आणि नाशिक शहरामध्ये भीषण आगीच्या घटना घडल्या. ऐन थंडीत वारंवार आग लागत असल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. कारण, यामुळे मोठी जीवितहानी होण्याचा धोका आहे. भंडाऱ्यामध्ये रुग्णालयाला आग लागल्याची घटना ताजी असतानाच काल पुण्यात आणि आज नाशिकमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. (Why does a fire incident happen in winter and cold days Read detailed)

खरंतर, संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयात लागेलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. 9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. ही घटना कुठे ताजी असतानाच गुरुवारी पुण्यामध्ये कोरोना लसीच्या इमारतीलाच भीषण आग लागली. गुरुवारी पुण्यातील कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला (Serum Institute Building) भीषण आग लागली होती. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीच्या या घटनेनंतर आज नाशिकमध्येही आगीचा तांडव पाहायला मिळाला. आज नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयाला ही आग लागली.

आग लागण्याचे नेमकी कारणं काय?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा आग तयार होते. अशात थंडीत मात्र हवेत गारवा असतो. पण तरीदेखील आगीच्या घटना समोर येणं ही चिंतेची बाब आहे. आता आग नेमकी कोणत्या कारणाने लागू शकते याचाही विचार करणं महत्त्वाचा आहे.

– जंगलांमध्ये झाडांना आग लागणं हे नैसर्गिक असून शकतं. इथे झाडं आणि फांद्यामध्ये घर्षण झाल्याने उष्णता निर्माण होते आग लागते.

– घरात जर आग लागली तर त्याचं कारण निष्काळजीपणा असून शकतो. गॅस चालू असणं, वीजेचा शॉक सर्कीट होणं, स्टोव्हचा वापर यामुळे आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

– पेट घेणारी रसायनं, पेट्रोलियम पदार्थ, विजेंच्या तारांची चुकीच्या पद्धतीने मांडणी केली तरीदेखील आग पेटते. सध्या मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर केला जातो. थंडीत आग लागण्याचं हे मुख्य कारण असू शकतं.

– एखाद्या घरात , कंपनीत किंवा इतर कुठेही पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पडल्या असतील आणि त्याचा आगीशी संबंध आला तर त्याने मोठे आगीचे लोळ पसरतात.

– अशात सिगारेट ओढून कुठेही फेकणं, सार्वजनिक ठिकाणी ती न विझवता फेकण्यामुळे अनेक आगीच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे.

– फटाक्यांच्या वापरामुळेही आग लागते.

थंडीच्या दिवसांमध्ये का लागते आग?

आग लागण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे वारा, त्याची गती आणि त्याची वाहण्याची दिशा. जास्त आणि कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे वाऱ्याची गती आणि दिशा सतत बदलत असते. जेव्हा कमी व जास्त दाबाचा पट्टा तयार होतो तेव्हा तिथे तापमानविसंगती तयार होते. अशावेळी थंड हवेचा पट्टा त्याच्याबरोबर किंवा त्याच्यासमोर असणाऱ्या उष्ण हवेला पुढे ढकलत राहतो. या ‘धक्क्या’मुळे आगीची तीव्रता अनेक पटीनं वाढते. अशात आग आपली दिशा सतत बदलत असल्यामुळे ती चहुबाजूला पसरते. (Why does a fire incident happen in winter and cold days Read detailed)

संबंधित बातम्या – 

Bhandara Hospital Fire : भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात अखेर मोठी कारवाई, सिव्हिल सर्जनसह 6 जणांचं निलंबन

Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग, पाच जणांचा मृत्यू

Nashik Municipal Corporation Building Fire : नाशिक महापालिकेच्या इमारतीत आग

(Why does a fire incident happen in winter and cold days Read detailed)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.