AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार का? अजित पवार यांनी अखेर सांगूनच टाकलं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार का? अजित पवार यांनी अखेर सांगूनच टाकलं
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 10, 2025 | 5:35 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केले. गेल्या काही काळापासून विरोधक राज्य सरकारची लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे विधान करत आहेत. त्यानंतर आता लाडकी बहीण योजना बंद होणार का? यावर अजित पवारांनी उत्तर दिले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

लाडकी बहीण योजना बंद होणार का? अजित पवार म्हणाले…

लाडकी बहीण योजना बंद होणार का? यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो. महिना संपल्यावर आदिती मला संपर्क साधते आणि दादा महिलांना पैसे द्या म्हणून सांगते. आम्ही तातडीने पैसे देतो.’ अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींनी चिंता करण्याची गरज नाही.

पक्ष मोठा करायचा आहे – अजित पवार

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. त्यासाठी जास्तीजास्त जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी लोक आपल्या पक्षात येत आहेत. मी बुलढाण्याला जात आहे. तिथे अनेकजण आपल्या पक्षात येणार आहे. प्रतापराव चिखलीकर , निशिकांत पाटील हे प्रयत्न करत आहेत. पदाधिकारी प्रयत्न करत आहेत, त्यामुळे लोक आपल्याकडे येत आहेत. नवीन येणाऱ्यांचं स्वागत करू. पण जुन्या लोकांनी आमचं काय असा विचार करू नये. तुमचंही चांगलं होईल. ज्याच्यात नेतृत्व असेल, धमक असेल, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालता येईल त्याला संधी दिली जाईल.

सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या, अजित पवारांचे निर्देश

अजित पवार म्हणाले की, ‘पुणे पिंपरी चिंडवडमध्ये १० लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नाशिकमध्ये पाच लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीने एक कोटीचं टार्गेट आपण ठेवलं आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या. गरीब असो की डॉक्टर इंजिनियर वकील असो. त्यांना सभासद करून घ्या. प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडा. तुम्ही लोकांशी संपर्क करा, असे आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?