AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार? पक्षावरील पकड सुटणार? तज्ज्ञांचे विश्लेषण काय? मोठी अपडेट समोर

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. आता त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुनेत्रा पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार? पक्षावरील पकड सुटणार? तज्ज्ञांचे विश्लेषण काय? मोठी अपडेट समोर
Sunetra Pawar NoticeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 13, 2026 | 6:10 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील काही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सुनेत्रा पवार यांना पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. .यात राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांचे पद जाणार? त्यांची पक्षावरील पकड कमजोर होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणावर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले विजय चोरमारे?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटले की, ‘अजित दादा गेल्यापासून राष्ट्रवादीत आपल्याला वेगळंच राजकारण पहायला मिळत आहे, सुरवातीच्या काळात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्ष चालवत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सुनेत्रा पवार त्यांचं वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसत होतं. हे सगळं होत असताना पुन्हा दोघांमध्ये समेट होऊन पुन्हा पक्ष पुढे नेण्याची चर्चा सुरू होती. पण असं असलं तरी वरवर दिसणारं चित्र आणि आतमधील खदखद थांबली नव्हती.’

पुढे बोलताना चोरमारे यांनी सांगितले की, ‘आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान देण्यात आलं आहे, हे कितपत टिकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुनेत्रा पवार यांची निवड ही रितसर पक्षाची बैठक बोलावून घेतलेली होती. सगळी प्रक्रिया नियमाने पार पाडलेली होती. त्याबाबत निवडणूक आयोगाला कळवलं देखील होतं. त्यामुळे मला आता यात फार काही मोठी घडामोड होईल असं वाटत नाही. मात्र पक्षात काय चाललं आहे नीट चाललेलं नाही. किंवा नीट चाललेलं असेल तर नीट चालू द्यायचं नाही असे प्रयत्न यात दिसत आहेत. त्यामुळे याबाबत जरी नोटीस काढली असली तरी याचा फारसा परिणाम होईल असं मला वाटत नाही.’

Follow Us
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी