AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरासमोर झोपलेली महिला झाली गायब, सत्य समोर येताच अख्ख गाव हादरलं, गावकऱ्यांना फुटला घाम, गोंदियामध्ये नेमकं काय घडलं?

गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, घरासमोर झोपलेली महिला अचानक गायब झाली, मात्र त्यानंतर सत्य समोर येताच ग्रामस्थांची पाचावर धारण बसली आहे, संपूर्ण गाव हादरलं

घरासमोर झोपलेली महिला झाली गायब, सत्य समोर येताच अख्ख गाव हादरलं, गावकऱ्यांना फुटला घाम, गोंदियामध्ये नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2025 | 3:55 PM
Share

गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलेल्या महिलेवर वाघानं हल्ला केला आहे. या महिलेला वाघानं ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह ओढून नेल्याची घटना घडली आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धमदी टोला या गावात ही घटना घडली आहे. तर या घटनेच्या तीन दिवस आधीच मोरगाव अर्जुनी तालुक्यातील संजयनगरमध्ये एका पाच वर्षांच्या मुलाला बिबट्यानं उचलून नेलं होतं, दरम्यान या घटनेनंतर आता ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  घरासमोर उभा असलेल्या 5 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना अगदी ताजी असतानाच, आता गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील धमदिटोला येथे झोपेत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रभाबाई कोराम (49) असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रभाबाई कोराम या  आपल्या मुलीच्या गावी धमदीटोला येथे आल्या होत्या. दरम्यान रात्री घराच्या व्हरांड्यात त्या झोपल्या असताना मध्यरात्री वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर वाघाने त्यांना ब्लांकेट आणि मच्छरदाणीसह जंगलात फरफटत नेले. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

ग्रामस्थ आक्रमक  

दरम्यान आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे, वाघाच्या हल्ल्यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर या महिलेला वाघानं ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह जंगलात ओढून नेले.  घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. मृत महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे. त्यानंतर वनविभागाच्या वतीनं या महिलेच्या नातेवाईकांना तात्पुरती एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. उर्वरीत 24 लाखांची मदत आठवडा भरात मिळेल असं आश्वासन वन अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना देण्यात आलं आहे.  या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.