AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होणार, श्रीकांत शिंदे यांची माहिती

रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. (shrikant Shinde railway lines)

पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण  होणार, श्रीकांत शिंदे यांची माहिती
| Updated on: Dec 02, 2020 | 11:45 PM
Share

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकातील लोकग्राम पुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. जुना पूल येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येईल. त्यानंतर लगेच नव्या पूलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर चिखलोली स्थानकाच्या कामालादेखील देण्यात आली आहे. याशिवाय रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. (work of fifth and sixth lines of the railway is in the final stage said Dr. shrikant Shinde)

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक

मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत खासदार डॉ. शिंदे यांची बुधवारी ( 2 डिसेंबर) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. यावेळी ठाण्यापुढील प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विविध प्रकल्पांच्या पूर्ततेत कुठलीही दिरंगाई करू नका, अशी सूचना डॉ. शिंदे यांनी  केली.

तर 50 जादा फेऱ्या सुरू करता येतील

पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसंदर्भात माहिती देताना खासदारांनी सांगितले की, “पारिसक येथून खाडीच्या दिशेने जाणाऱ्या एलिव्हेटेड मार्गिकांचे काम जवळपास 85 टक्के पूर्ण झाले आहे. महत्त्वाच्या गर्डरचे लाँचिंग पुढील मिहन्यात होणार आहे,” तसेच या मार्गिका प्रवासी सेवेत दाखल झाल्यानंतर ठाण्यापासूनच्या प्रवाशांसाठी किमान 50 जादा फेऱ्या सुरू करता येतील,” अशीही माहिती त्यांनी दिली.

“लोकग्राम येथील पुलाच्या पाडकामाला लवकरच सुरुवात होईल. मिळालेल्या माहितीनुसार 31 जानेवारी 2021 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. हे पाडकाम सुरू असतानाच नव्या पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवा, जेणोकरून पाडकाम पूर्ण होताच नव्या बांधकामाला सुरुवात करता येईल,” अशी सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. या नव्या पुलासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे लवकरच रेल्वेकडे 78 कोटी रुपये जमा केले जातील,” असेही शिंदे यांनी सांगितले.

कोपर आणि अंबरनाथ स्थानकांमधील होम प्लॅटफॉर्मचे कामदेखील प्रगतिपथावर असून कोपर येथील काम 31 मार्च 2021  पर्यंत, तर अंबरनाथ येथील काम 31 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीही खासदार शिंदे यांनी दिली.

संबंधित बातम्या :

वाहन सुस्थितीत असल्याशिवाय रस्त्यावर आणू नका, कल्याण वाहतूक पोलिसांचं आवाहन

कल्याणमध्ये कॉंक्रिटीकरणावरुन राजकारण, एकाच रस्त्याचं भाजप आणि शिवसेनेकडून उद्घाटन

‘राज्य सरकारने निर्णय घेतल्याशिवाय वीजबिल भरु नका’, कल्याणचे शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रेंचं आवाहन

(work of fifth and sixth lines of the railway is in the final stage said Dr. shrikant Shinde)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.