कल्याणमध्ये कॉंक्रिटीकरणावरुन राजकारण, एकाच रस्त्याचं भाजप आणि शिवसेनेकडून उद्घाटन

या रस्त्याचे उद्घाटन शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाकडून करण्यात आले आहे.

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 14:31 PM, 30 Nov 2020
कल्याणमध्ये कॉंक्रिटीकरणावरुन राजकारण, एकाच रस्त्याचं भाजप आणि शिवसेनेकडून उद्घाटन

कल्याण : कल्याणमध्ये एका रस्त्याचं कॉंक्रिटीकरण करण्यात आलं. रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात (Kalyan BJP VS Shivsena) आला आहे. मात्र, या रस्त्यावरुन कल्याणमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. या रस्त्याचे उद्घाटन शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाकडून करण्यात आले आहे. हा रस्ता माझ्या पाठपुराव्याने तयार झाला आहे. कोणाच्याही बापाला बाप आपला बोलायचे आणि नारळ फोडायचा अशी घणाघाती टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे. तर श्रेय कोणालाही घेऊ द्या, लोकांना माहीत आहे. रस्त्याचं काम कोणी केले आहे, असं प्रतिउत्तर शिवसेना भाजप आमदाराला दिला आहे (Kalyan BJP VS Shivsena).

कल्याण-पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा धर्मवीर आनंद दिघे पुलाचा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेकडून करण्यात आले. चार कोटी 35 लाख एमएमआरडीएच्या निधीतून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जवळपास एक महिना हा रस्ता बंद असल्याने नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागला अखेर रस्त्याचे काम झाले. आता या रस्त्याचा श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप आमने सामने आले आहेत.

आज सकाळी 9 वाजता शिवसेनेचे धनंजय बोराडे, नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक रमेश जाधव, शरद पाटील आणि परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्या हस्ते रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. शिवसेना नगरसेवक धनंजय बोराडे यांनी रस्त्याच्या कामासाठी पालक मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त आणि महापौर विनिता राणे यांना धन्यवाद दिले आहे (Kalyan BJP VS Shivsena).

कामाचं श्रेय आता कोणालाही घेऊ द्या, लोक देणार नाही. लोकांना माहिती आहे काम कोणी केलं आहे. पालकमंत्र्यांचे आदेशानंतर आज आम्ही रस्त्याचे उद्घाटन केले आहे. या रस्त्याच्या उद्घाटनानंतर नागरिकांच्या त्रास आता कमी होणार आहे.

शिवसेनेच्या कार्यक्रमानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या हस्ते भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले, की हा रस्ता माझ्या पाठपुराव्याने आणि भाजपचे सरकार असताना निधी मंजूर करण्यात आला होता. आम्ही उद्घाटन करणार होतो, त्यापूर्वी काही लोकांनी उद्घाटन केले. खरं दाखवा निधी तुम्ही आणला का?, असा सवाल उपस्थित करत कोणाच्याही बापाला आपला बाप बोलायचे आणि नारळ फोडायचे अशी घणाघाती टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे.

येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत राजकारण चांगलं तापले आहे.

Kalyan BJP VS Shivsena

संबंधित बातम्या :

कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डरचे 10 % काम अपूर्ण; काम पूर्ण करण्यासाठी आणखी एक मेगाब्लॉक होणार?