Corona Update : यवतमाळला मोठा दिलासा, कोरोनाबाधित 10 पैकी 4 रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह

Corona Update : यवतमाळला मोठा दिलासा, कोरोनाबाधित 10 पैकी 4 रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह

यवतमाळमध्ये 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यापैकी 4 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे (Yavatmal corona patients).

चेतन पाटील

|

Apr 18, 2020 | 9:27 PM

यवतमाळ : राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी सरकार आणि प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे (Yavatmal corona patients). त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळताना दिसत आहे. यवतमाळमध्ये 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यापैकी 4 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे रुग्ण 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत (Yavatmal corona patients).

दरम्यान, उर्वरित 6 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या 6 पैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, या रुग्णाचीदेखील प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली. यवतमाळमध्ये ज्या भागांमध्ये रुग्ण आढळले आहेत तो परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. लोकांनी घराबाहेर पडून संचारबंदीचं उल्लंघन करु नये म्हणून पोलीस ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवत आहेत.

यावतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 767 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान, आज 38 जणांचे नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविले आहे. तर संस्थात्मक विलगीकरणात 34 जण दाखल आहेत.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 648 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 328 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील 184 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. तर पुण्यात 78 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

मुंबई – 184 पुणे – 78 अकोला – १ अमरावती १ औरंगाबाद – १ कल्याण डोंबिवली – ५ मिरा -भाईंदर – ११ नागपूर – ३ नंदुरबार – १ नवी मुंबई – २ पालघर – ७ पनवेल – १ पिंपरी चिंचवड – ८ पुणे ग्रामीण – १ रायगड – ५ सातारा – ४ सोलापूर – २ ठाणे – ९ वसई विरार – १ भिवंडी – ३

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी:

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 2085 30 122
पुणे (शहर+ग्रामीण) 467 19 46
पिंपरी चिंचवड 37 1
ठाणे (शहर+ग्रामीण) 125 3
नवी मुंबई 63 8 3
कल्याण डोंबिवली 68 2
उल्हासनगर 1
भिवंडी 1
मीरा भाईंदर 53 2
वसई विरार 61 1 3
पालघर 14 1
रायगड 8
पनवेल 28 1 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 8
मालेगाव 45 2
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 28 3 1
धुळे 1 1
जळगाव 2 1
सोलापूर 12 1
सातारा 7 2
कोल्हापूर 5 1
सांगली 26 4
सिंधुदुर्ग 1
रत्नागिरी 6 1
औरंगाबाद 28 5 2
जालना 2
हिंगोली 1
परभणी 1
लातूर 8
उस्मानाबाद 3 1
बीड 1
अकोला 14 1
अमरावती 5 1
यवतमाळ 13 3
बुलडाणा 21 1 1
वाशिम 1
नागपूर 57 5 1
गोंदिया 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 11 2
एकूण 3320 331 201

संबंधित बातमी :

मुंबईत एका दिवसात 184 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

वाशिममध्ये कोरोनाचा शिरकाव, दोन रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या रुग्णाचा तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें