एका इंजेक्शनसाठी तब्बल 12 हजार, रेमडेसिव्हीरच्या अवैध विक्रीने खळबळ, पोलिसांनी सापळा रचून केला पर्दाफाश

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार समोर आला आहे. (yavatmal police remdesivir injection corona pandemic)

एका इंजेक्शनसाठी तब्बल 12 हजार, रेमडेसिव्हीरच्या अवैध विक्रीने खळबळ, पोलिसांनी सापळा रचून केला पर्दाफाश
REMDESIVIR CORONA

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग (Corona pandemic) वाढत असताना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir injection) विक्रीचा काळाबाजार समोर आला आहे. कळंब येथे अवैधरित्या इंजेक्शन विकणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. कळंबकमध्ये केलेली ही यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई आहे. आज (08 मे) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये ताब्यात घेतलेल्यांमध्ये एक डॉक्टर आणि मेडीकल चालकाचा समावेश आहे. डॉ. अक्षय तुंडलवार, सावन पवार, सौरभ मोगरकर आणि बिलकीस बानो मोहम्मद इकबाल अंन्सारी अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. (Yavatmal police arrested Four people for illegal selling of Remdesivir injection amid Corona pandemic)

एका इंजेक्शनसाठी 12 हजार रुपये

मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ शहरासह जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी रुग्ण भटकंती करत आहेत. मात्र कळंब शहरात रेमडेसिव्हीरची अवैधरित्या विक्री सुरु आहे. दुर्वांकुर मेडीकल स्टोअर्समधून रेमडेसिव्हीरची दामदुप्पट दराने विक्री सुरू होती. याबाबतची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कळंब गाठले. तसेच फार्मसिस्ट सावन पवार याच्या मेडिकलमध्ये ग्राहक बनून प्रवेश केला. त्याला रेमडेसिव्हीरचे 3 इंजेक्शन मागितले असता त्याने प्रत्येक इंजेक्शनसाठी 12 हजार याप्रमाणे 36 हजार रुपयांची मागणी केली. यावेळी ग्राहकाने पैसे देण्यास होकार दिला. ठऱल्याप्रामए सावन पवार आणि डॉ. अक्षय तुंडलवार यांनी छत्रपती शिवाजी उड्डाण पुलावर 36 हजार रूपये घेऊन रेमडेसिव्हीर विकले. पोलिसांच्या या सापळ्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणारे बरोबर अडकले. या सर्व आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोन वेळा यशस्वी सापळा रचला

या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. अक्षय तुंडलवार याची रेमडेसिव्हीरबाबत चौकशी सुरू केली. त्यावेळी कळंब शहरातील सौरभ मोगरकर याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी थेट मोगरकर याच्या घरी जाऊन आणखी 12 रेमडेसिव्हीरच्या इंजेक्शनची मागणी केली. त्यानंतर ठऱल्याप्रमाणे यवतमाळातील बिलकीस बानो मोहम्मद इकबाल अंन्सारी या महिलेला 60 हजार रुपये देऊन येथून थेट 12 इंजेक्शन घेतले. पोलसांनी रचलेला हा दुसरा सापळासुद्धा यशस्वी झाला. त्यानंतर रेमडेसिव्हीरची विक्री करणारे हे मोठे जाळे उघडकीस आले.

अंबरनाथमध्ये रेमडेसिव्हीरचा काळाबाजार

यवतमाळसोबतच महाराष्ट्रात इतर ठिकाणीसुद्धा रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार जोमात सुरु असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ पालिकेच्या डेंटल कॉलेजमधील सेंटरमध्येच हा अवैध प्रकार सुरु होता. येथे फक्त 2 इंजेक्शन तब्बल 40 हजार रुपयांना विकण्यात आले आहे. मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण गोडसे यांनी हा काळाबाजार उघडकीस आणला. ही इंजेक्शन पालिकेच्या डॉक्टरांनीच दिल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान यवतमाळ रेमडेसिव्हीर विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इतर बातम्या :

Special Report | मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांची कोंडी? भाजपा बॅकफुटवर?

Maharashtra Coronavirus LIVE Update : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 2014 नवे रुग्ण आढळले

States Lockdown Update : देशात कोणकोणत्या राज्यांमध्ये लॉकडाऊन ? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि नवे निर्बंध

(Yavatmal police arrested Four people for illegal selling of Remdesivir injection amid Corona pandemic)