150 रुपयांत 250 किलोमीटरचा प्रवास, या विद्यार्थ्यानं बनविली सोनिक कार

प्रायोगिक तत्वावर ही कार तयार केली. त्यासाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च आला आहे. इंटरनेट सेवा पुरविण्याच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशातून ही कार बनविल्याची माहिती हर्षल नक्षणे यांनी दिली.

150 रुपयांत 250 किलोमीटरचा प्रवास, या विद्यार्थ्यानं बनविली सोनिक कार
यवतमाळच्या विद्यार्थ्याने बनविली सोनिक कारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 4:42 PM

विवेक गावंडे, टीव्ही ९, यवतमाळ : जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी ओळखला जातो. याच जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने भन्नाट कल्पनेतून स्वयंचलित हायड्रोलिक कार बनवली. केवळ 150 रुपयात 250 किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. वाहन वापरणा-यांची संख्या वाढली. दररोज हजारो वाहने रस्त्यावरून धावत आहे. तसेच पेट्रोल व डिजेलचे दर 100 रुपयांवर पोहचलेत. यावर उपाय म्हणून वणी येथील हर्षल नक्षणे नामक युवकाने प्रदूषणमुक्त स्वयंचलित सोनिक कार तयार केली. कुणाल आसुटकर या मित्राची त्यानं मदत घेतली.

हर्षलने एमटेकपर्यंत शिक्षण घेतले. या युवकाचे एक स्वप्न होते की, भारताकडे स्वत:ची कार धावण्यासाठी सक्षम असली पाहिजे. परवडणाऱ्या किमतीत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा वापरणे आणि अपघात आणि मानवी चुका कमी होतील अशी कार हवी. त्या दृष्टिकोणातून हर्षल नक्षणे याने एक कंपनी रजिस्टर केली.

कुणाल आसुटकर या विज्ञान शाखेत भाग तीनला शिक्षण घेत असलेल्या बालपणीच्या मित्राच्या मदतीने कार बनविण्याचे काम सुरु केले. गेल्या काही दिवसांपूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर चालविणारी ही कार आहे. सेल्फ ड्रायव्हींगसाठी संगणक तयार केले आहे.

एक लिटर हायट्रोजन (किंमत 150 रुपये) मध्ये 250 किलोमीटर धावणार आहे. त्यामुळे पेट्रोल व डिजेलवर चालणा-या वाहनापासून सुटका होणार आहे. फक्त कारसाठी लागणारे काच व टायर ह्या वस्तू अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आले.

प्रायोगिक तत्वावर ही कार तयार केली. त्यासाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च आला आहे. इंटरनेट सेवा पुरविण्याच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशातून ही कार बनविल्याची माहिती हर्षल नक्षणे यांनी दिली.

सेल्फ ड्रायव्हींग व हायट्रोजन फ्युल सिस्टमचे पेटंट नोंदणी केली आहे. 100 कार तयार झाल्यानंतर ही कार विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.