AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनेक तास बचावकार्याचा थरार, हेलिकॉप्टरचा प्रयत्न फसला, अखेर 8 ते 10 तासांनी 110 जणांचे प्राण वाचले

यवतमाळच्या आनंदनगर महागाव येथे अडकलेल्या 110 जणांची अखेर सुखरुप सुटका झालीय. पण गेल्या आठ ते दहा तासांपासून या नागरिकांच्या सुटकेसाठी बचावकार्याचा थरार सुरु होता.

अनेक तास बचावकार्याचा थरार, हेलिकॉप्टरचा प्रयत्न फसला, अखेर 8 ते 10 तासांनी 110 जणांचे प्राण वाचले
| Updated on: Jul 22, 2023 | 8:33 PM
Share

यवतमाळ | 22 जुलै 2023 : यवतमाळमध्ये गेल्या 24 तासात 240 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे पूस आणि पैनगंगा नद्यांना पूर आलाय. या पुराच्या पाण्याने आनंदनगर महागावला चारही बाजूने अक्षरश: वेढा घातला. गावातील घरांमध्ये पाणी शिरलं. गावचा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. आनंदनगर महागाव जिथे वसलं आहे तिथे पैनगंगा आणि पूस नदीचा संगम आहे. याशिवाय गावाच्या एका बाजूने नालादेखील वाहतो. त्यामुळे गावकरी चारही बाजूने अडकून पडले. या गावकऱ्यांची जवळपास 110 इतकी संख्या होती. गावकऱ्यांनी मोबाईल फोनच्या माध्यमातून प्रशासनाला मदतीसाठी विनंती केली. पण गावात जाण्यासाठी कोणताच रस्ता नसल्याने प्रशासनदेखील चिंतेत पडलं.

या दरम्यान आनंदनगर महागावचे 80 ते 100 गावकरी पुराच्या पाण्यात अडकल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली. प्रशासन सुरुवातीला जो रस्ता पाण्याखाली गेला त्याने नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतं. पण नंतर प्रवाह वाढल्याने ते प्रयत्न देखील निष्फळ ठरलं. पुरात अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश होता. त्यामुळे धाकधूक वाढली होती. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरात अडकलेल्या सर्व गावकऱ्यांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू केलं जाईल, असं सांगितलं.

हेलिकॉप्टरने बचावकार्याचा प्रयत्न अयशस्वी

देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर लगेच काही काळाने घटनास्थळी हेलिकॉप्टर दाखल झालं. हेलिकॉप्टर हवेत घिरट्या मारत होतं. पण हेलिकॉप्टरला खाली उतरण्यासाठी जागा नव्हती. वातावरण खराब होतं आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे हेलिकॉप्टरचा प्रयत्न अयशस्वी ठरला. हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी आले होते. या हेलिकॉप्टरने दोनवेळा प्रयत्न करण्यात आला. पण दोन्हीवेळा प्रयत्न अयशस्वी ठरला.

आठ ते दहा तासांच्या प्रयत्नांनी गावकऱ्यांची सुटका

हेलिकॉप्टरचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर एसडीआरएफचं पथक बोटीच्या सहाय्याने पाण्यात उतरलं. या पथकाने बोटीच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू सुरु केलं. यामध्ये त्यांना यश आलं. एसडीआरएफच्या पथकाने तब्बल 110 नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढलं. यातील आनंदवाडी येथील 85 नागरिक शाळेत हलविण्यात आले. तर इतर 25 नागरिक हे नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाले. मागील 8 ते 10 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. या रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून सर्वांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एसडीआरएफच्या टीमचं अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर या रेस्क्यू ऑपरेशनवर समाधान व्यक्त केलं आहे. “यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून आताच प्राप्त माहितीनुसार, महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे अडकलेल्या सर्व 110 नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या देखरेखीत #SDRF चमूने बोटींच्या साहाय्याने हे मिशन पूर्ण केले. संपूर्ण टीमचे अभिनंदन”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.