Accident | अॅक्टिव्हा गाडी घेऊन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी गेली; वणी येथील रस्त्यात चायनीज मांजाने चिरडले

वणी शहरात सकाळी भयानक घटना घडली. विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी जात होती. चायनीज मांजाने तिचा गळा चिरला. यात तिला दहा टाके लागले आहेत. यावरून हा मांजा किती खतरनाक असतो, हे समजते.

Accident | अॅक्टिव्हा गाडी घेऊन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी गेली; वणी येथील रस्त्यात चायनीज मांजाने चिरडले
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 12:58 PM

यवतमाळ : ही घटना आहे वणी शहरातील. जैन लेआऊट येथील विद्यार्थिनी (Student at Jain Layout) सराव परीक्षा देण्यासाठी घरून निघाली. सकाळी आठच्या सुमारात तिने अॅक्टिव्हा गाडी घेतली. एका मैत्रिणीला घेऊन शाळेत सराव परीक्षेसाठी (For a practice test at school with a girlfriend) जात होती. आवारी लेआऊटमधील मनोहर मुके यांच्या घराजवळ डांबर रोड आहे. त्याठिकाणी अचानक पतंगीचा मांजा विद्यार्थिनीच्या गळ्यात लटकला. चायनीज मांजा असल्यानं तिचा गळा कापला गेला. यात जखमी झालेल्या तनुश्री विलास पारखीला (Tanushree Vilas Parkhi) वणीच्या सुगम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तनुश्रीच्या गळ्याला दहा टाके मारण्यात आले. यावरून पतंगीचा मांजा किती धारधार होता हे जखमेवरुन लक्षात येते.

बंदी असताना विक्री कशी

या चायनीज मांजावर शहरात बंदी आहे. तरीही शहरात मोठ्या प्रमाणात चायनीज मांजाची विक्री होत आहे. ही गंभीर बाब आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मांजा कंपनीतून दुकानात येतो. दुकानातून चिल्लर विक्री केला जातो. अशावेळी प्रशासन काय करते, असा सवाल विचारला जात आहे.

मारेगावात बोलेरोच्या धडकेत एक ठार

यवतमाळ – दुसऱ्या एका घटनेत मारेगाव येथे बोलेरो वाहनाने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीची मोडतोड झाली. यात तिचा चालक जागीच ठार झाला. अपघाताची ही घटना शुक्रवारी खैरगाव भेदी ते बोटोणी मार्गावर घडली. ढोकी येथील परशराम नागोराव टेकाम असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. परशराम दुचाकीने खैरगाव मार्गे बोटोणीकडे जात होता. विरुद्ध दिशेने येणार्‍या बोलेरो वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीची मोडतोड झाली. परशराम हा गंभीर जखमी झाला. अपघाताची ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी जखमीला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, परशरामचा मृत्यू झाला.

Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?

Nagpur | एका सुरेल युगाचा अंत; लतादीदींच्या निधनावर डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला शोक

नागपुरातील रस्त्यांच्या सफाईसाठी मेकॅनिकल रोड स्विपिंग मशीन; रात्रीच्या वेळी होणार प्रमुख मार्गांची स्वच्छता

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.