AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊन रडले’, आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा

"तुम्ही शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच पण तुम्ही माणूस आणि व्यक्ती म्हणून अपयशी ठरलात. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या नेत्याने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या परिवाराने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या पक्षाने तुम्हाला सर्व काही दिलं त्याच व्यक्तीचे तुम्ही बाप चोरायला निघालेत. त्याच व्यक्तीचा पक्ष आणि इमान चोरायला निघालात. सर्वच चोरायला निघालात", असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.

'त्यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊन रडले', आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा
aaditya thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 18, 2024 | 7:54 PM
Share

ठाणे | 18 फेब्रुवारी 2024 : ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची ठाण्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कल देखील केले. तसेच एकनाथ शिंदे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याजवळ येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. “गेल्या पाच-सहा वर्षात मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एवढं रडताना पाहिलं आहे, त्याचे किती कारणं आहेत. उल्हासनगरचा धीरज ठाकूर म्हणून तरुण नगरसेवक होता. त्याने खासदारकीसाठी कल्याणमध्ये खूप मेहनत घेतली. त्याने जीव की प्राण अशी मेहनत केली. सगळं काही केलं. मी त्याला सांगितलं होतं की, एक संधी आपण धीरजला दिलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी जी रडणं सुरु केलं, नाही साहेब. तुमचा विश्वास नाही. मी राजीनामा देतो. मी म्हटलं, जाऊदे. तुमचं तुम्हाला लख लाभो. तसंच ठाण्याचे हल्ली जे शिव्या देत असतात ते आपल्या पक्षात आले होते. त्यांना तिकीट द्यायचं होतं. उद्धव ठाकरेंनी ठरवलं तिकीट देऊयात. पण त्यांनी तेव्हा पुन्हा रडारड सुरु केली”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

“एवढंच काय, कल्याणमध्ये ते केलं होतं ना, मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही. आणि म्हणून… मी.. बापरे हा काय प्रकार आहे. ते 20 मे 2022 च्या दिवशीसुद्धा वर्षा बंगल्यावर येऊन उद्धव ठाकरेंसमोर असेच रडले होते की, मला तुम्ही यापासून वाचवा. भाजप मला जेलमध्ये टाकेल. आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही, असं म्हणाले. त्यानंतर बरोबर एक महिन्यात ते भाजपात गेले. पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं आहे”, असा शब्दांत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला.

“मी जेव्हा जेव्हा ठाण्यात आलोय तेव्हा ठाणेकरांनी एवढं प्रेम दिलं आहे की कधीही असं वाटत नाही, आपल्यातून गद्दार गेले आहेत. ठाणे जसंच्या तसं शिवसेनेचं राहीलं आहे. महिलांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. कारण ते जिथे आहेत तिथे सुरक्षा, विश्वास, प्रगती आहे. अनेक गोष्टी बोलण्यासाख्या आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘खोटं बोला पण रडून बोला’

“आपल्या राज्यात हल्ली एक फॅशन झालीय. खोटं बोला पण रडून बोला. आधी भाजप बोलायची खोटं बोला पण रेटून बोला. आता मिंधे बोलतात, खोटं बोला पण रडून बोला. काल त्यांनी एवढ्यासाठीच अधिवेशन घेतलं होतं की, माझे वडील किती अपयशी ठरले आहेत हे त्यांना तोंडावर लोकांसमोर सांगण्याठी अधिवेशन घेतलं. मी जास्त काही पाहिलं नाही. कारण मला त्यांना रडत बघण्याची सवय जुनी आहे. काही झालं तर डोळ्यांतून अश्रू काढायचं आणि रडायचं. पण आता लोकं ओळखून आहेत”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

“आम्ही किती उदाहरणं देऊ. तुम्ही शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच पण तुम्ही माणूस आणि व्यक्ती म्हणून अपयशी ठरलात. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या नेत्याने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या परिवाराने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या पक्षाने तुम्हाला सर्व काही दिलं त्याच व्यक्तीचे तुम्ही बाप चोरायला निघालेत. त्याच व्यक्तीचा पक्ष आणि इमान चोरायला निघालात. सर्वच चोरायला निघालात. पण मी आजही तुम्हाला सांगतो. या महाराष्ट्रातून दोन गोष्टी पुसल्या जाऊ शकत नाहीत. एक म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथ्यावर गद्दार, बाप चोर, पक्ष चोर म्हणून जो शिक्का आहे तो कुणी पुसू शकत नाही”, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.