EPFO | ठरलेल्या तारखेला पेन्शन जमा न झाल्यास मिळणार भरपाई…एका क्लिकवर जाणून घ्या नवीन नियम

EPFO | ठरलेल्या तारखेला पेन्शन जमा न झाल्यास मिळणार भरपाई...एका क्लिकवर जाणून घ्या नवीन नियम
EPFO

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओबाबात नवीन आदेश जारी केले आहेत. त्यामुळे नवीन आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे ईपीएफओने परिपत्रकात म्हटलं आहे. यासोबतच सर्व कार्यालयांनी त्यांच्या अखत्यारीतील बँकांनाही या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना ईपीएफओने पाठवल्या आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 26, 2022 | 3:12 PM

पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आणि त्यात अजून एक मोठी आनंदाची बातमी आहे. पेन्शनधारकांना महिन्यांच्या शेवटी म्हणजे पूर्वी पगार यायचा तसा म्हणजे महिन्याच्या शेवटच्या तारखेला पेन्शन मिळणार आहे. म्हणजे ठरलेल्या तारखेला पेन्शनधारकांच्या बँक खात्यात पेन्शन जमा होणार आहे. आणि जर ठरलेल्या तारखेला पेन्शन जमा झाली नाही तर पेन्शनधारकांना त्याबदल्यात भरपाई मिळणार आहे. सेवानिवृत्ती निधी संस्थाने यासंदर्भात 13 जानेवारीला एक परिपत्रक काढलं आहे. ईपीएफओबाबात नवीन आदेश जारी केले आहेत. त्यामुळे नवीन आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे ईपीएफओने परिपत्रकात म्हटलं आहे. यासोबतच सर्व कार्यालयांनी त्यांच्या अखत्यारीतील बँकांनाही या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना ईपीएफओने दिल्या आहेत. त्यानुसार महिन्याच्या शेवटच्या दिवशी पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शन जमा करण्याचे आदेश आहे. शेवटच्या दिवशी किंवा त्या दिवसाच्या पूर्वी पेन्शनधारकांना पेन्शन मिळणे आता बंधनकारक झालं आहे.

नियमांचे सक्तीने पालन करा

पेन्शनधारकांना जी रक्कम देण्यात येते ती रक्कम बँकांना दोन दिवसांपूर्वी पाठवली जाऊ नये, असंही या परिपत्रकारत म्हटलं आहे. तसंच या परिपत्रकारत दिलेले आदेशांचे सक्तीने पालन झाले पाहिजे. यासोबतच सर्व कार्यालयांनीच्या अखत्यारीतील बँकांनाही या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

किती मिळणार भरपाई

पेन्शनचे वितरण करणाऱ्या बँकांकडून जर पेन्शनधारकांना ठरलेल्या दिवशी पेन्शन देण्यात आली नाही तर पेन्शनधारकाला वार्षिक 8 टक्के व्याजाने भरपाई मिळणार. आणि ही भरपाई बँकेला पेन्शनधारकाच्या बँक खात्यात आपोपाप जमा करावी लागणार, असा नियम आरबीआयने काढला आहे.

पेन्शन कोणाला मिळते?

नोकरी करणाऱ्या प्रत्येकाचा पगारातून दरमहिना पीएफसाठी एक रक्कम कापली जाते. तसंच एक ठराविक रक्कम पेन्शनकडे वळवली जाते. 10 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाच्या 58 व्या वर्षी पेन्शन लागू होते. भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि पेन्शन फंडचे (EPS) पैसे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये जमा केले जातात. महत्त्वाचे म्हणजे EPF मध्ये योगदान देणारे कर्मचारी देखील EPS साठी पात्र असतात. अजून एक विशेष म्हणजे कर्मचाऱ्याचा मृत्यूनंतर त्याची पेन्शन त्याच्या कुटुंबियांना मिळते.

हे करा आणि पीएफ जमानिधी जाणून घ्या

ईपीएफओ असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईलवरवरुन 7738299899 आणि 011-22901406 नंबरवर फोन करुन तुम्ही जमानिधीची माहिती घेऊ शकता. ईपीएफ असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एसएमएसद्वारे ही माहिती मिळवू शकतात. त्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन ‘EPFOHO UAN LAN’ टाइप करा आणि 7738299899वर पाठवा. त्याशिवाय तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. आणि तुम्हाला एसएमएसद्वारे जमानिधीची माहिती मिळेल.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें