Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan | होमलोन दुसऱ्या बँकेत स्विच करायचंय? केव्हा आणि कधी करावं? जाणून घ्या, फायदे!

जे ग्राहक यापूर्वी गृहकर्जाचे हप्ते फेडत आहेत. त्यांना दुसऱ्या बँक खात्यामध्ये कर्ज हस्तांतरीत करता येते. ज्या बँकेत व्याजदर कमी आहेत अशा बँकेमध्ये ग्राहक त्याचे कर्ज प्रकरण हस्तांतरीत करू शकतो. त्यामुळे कर्ज घेतलेले असताना रक्कम वाचून बचत होते आणि ग्राहकाचा फायदा होतो.

Home Loan | होमलोन दुसऱ्या बँकेत स्विच करायचंय? केव्हा आणि कधी करावं? जाणून घ्या, फायदे!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 4:12 PM

एखादी बँक गृहकर्जावर (Home Loan) कमी व्याज (Low Interest) आकारत असेल तर इतर बँकेतील ग्राहकाला संबंधित बँकेत अथवा वित्तीय संस्थेत त्याचे गृह कर्ज प्रकरण हस्तांतरित करता येते. बँक  तुमच्या कर्जावर नाहक दंड आकारात असेल अथवा इतर  कर लावत असेल अशावेळी ही तुम्हाला गृह कर्जाचे प्रकरण दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करता येते. आजकाल ग्राहक (Customer) गृहकर्ज हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याचा विचार करत आहेत. रिझर्व्ह बँकेने नवीन नियमानुसार कर्ज हस्तांतरित करण्याची हाउसिंग फायनान्स (Housing Finance) कंपन्यांना मुभा दिली आहे. ही मुभा ग्राहकांसाठी सोयीचे ठरत आहे. या सुविधेमुळे त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणात वाचत आहे. एखादा ग्राहक कितीवेळा गृहकर्ज हस्तांतरित करू शकतो आणि त्याचा आर्थिक दृष्ट्या काय परिणाम होऊ शकतो हे बघूयात.

उदाहरणार्थ…

एखाद्या ग्राहकाने 20 वर्षांकरिता 8 टक्के व्याजाने 50 लाखांची गृहकर्ज घेतले आहे. या कर्जावर ग्राहकाला जवळपास 50 लाख रुपयांचे व्याज जमा करावा लागेल. जर व्याजदर 7.5% असेल तर ग्राहकाला व्याजापोटी 46.5 लाख रुपये चुकवावे लागतील. यामुळे तुमचे 3.5 लाख रुपये वाचतील.  जी बँक अथवा वित्तीय संस्था 8 टक्‍क्‍यांऐवजी 7.5 टक्के व्याजदर आकारात असेल अशा बँका व वित्तीय संस्थेकडे ग्राहक आकर्षित होणार नाहीत, असे कसे होईल. ग्राहकाचा 3.5 लाख रुपयांचा फायदा होत असल्याने  ग्राहक गृह कर्ज रक्कम हस्तांतरित करणारच.

जो ग्राहक गृहकर्जाचे हप्ते फेड करत आहे तो त्याचे गृह कर्ज प्रकरण जिथे व्याजदर कमी असेल अशा दुसऱ्या बँकेमध्ये हस्तांतरित करू शकतो. याला बॅलन्स ट्रान्सफर (Balance Transfer) असे म्हणतात. बॅलन्स ट्रान्सफर केल्यामुळे ग्राहकाला व्याजामध्ये खूप मोठा फायदा मिळतो. गृहकर्ज हस्तांतरित झाल्यानंतर नवीन बँकेच्या व्याज दरानुसार त्याला गृहकर्जाचा हप्ता भरावा लागतो. बॅलन्स ट्रान्सफर ची प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही. यामध्ये ग्राहकाला भुर्दंड बसू शकतो आणि त्याला शुल्क द्यावे लागू शकते.

किती लागेल शुल्क?

सर्वात अगोदर तुमच्या जुन्या बँकेतील गृहकर्जाचे रक्कम नवीन बँकेतील गृह कर्जात जमा करावी लागते. जर ग्राहकाने त्याच्या जुन्या बँकेकडून निश्चित व्याज दर ठरवून गृह कर्ज घेतले असेल तर गृहकर्ज हस्तांतरित करताना कर्जाच्या उर्वरित रकमेवर दोन टक्के रक्कम जमा करावी लागते. गृहकर्ज हस्तांतर करण्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही नवीन बँकेकडून गृहकर्ज घेत आहात. त्यामुळे नवीन बँक तुमच्याकडून या गृहकर्जाच्या प्रक्रियेसाठी प्रोसेसिंग शुल्क आकारेल. किती वेळा गृहकर्ज हस्तांतरित करता येते

ग्राहक त्याला वाटेल तोपर्यंत गृहकर्ज हस्तांतरित करू शकतो. परंतु फार अडचणीच्या काळात अथवा फार मोठा फायदा होत असेल तर ग्राहकाने गृहकर्ज हस्तांतरित करणे सोयीस्कर ठरेल.

जेव्हा तुम्ही गृहकर्ज हस्तांतरित करत असाल त्या प्रत्येक वेळी तुम्हाला याप्रकरणी दंड द्यावा लागेल आणि प्रक्रिया शुल्क सुद्धा जमा करावे लागेल अनेक वेळा गृहकर्ज हस्तांतरित करण्याची तुमची योजना तुम्हाला आर्थिक अडचणीत आणू शकते दंड आणि शुल्काचा रकमेमुळे तुम्हाला व्याज वाचवण्याची खटाटोप फायदेशीर ठरणार नाही.

बॅलन्स ट्रान्सफर (Balance Transfer) करण्याची प्रक्रिया फार वेळखाऊ असून त्यासाठी अनेक कागदपत्रांची तजवीज करून ठेवावी लागते ग्राहकाला या संपूर्ण प्रक्रियेत धावपळ करावी लागते आणि प्रक्रिया शुल्क व दंड रकमेची तजवीज करून ठेवावे लागते.

गृह कर्ज घेतल्यानंतर सुरुवातीलाच ग्राहकाला हप्त्यापोटी मोठी रक्कम चुकवावी लागते त्यामुळे सुरुवातीच्या काळातच गृहकर्ज हस्तांतर करण्याची प्रक्रिया फायदेशीर ठरू शकत नाही.

कामाच्या इतर बातम्या –

काय सांगता विना इंटरनेट पाठवता येतील पैसे !, एकावेळी 200 रुपये तर एकूण 2000 रुपयांचा करता येईल व्यवहार

घर स्वप्नांचं : निवड तुमची, शिफारस तज्ज्ञांची; गृह कर्ज की होम फायनान्स?

घर स्वप्नांचं : निवड तुमची, शिफारस तज्ज्ञांची; गृह कर्ज की होम फायनान्स?

खात्यात बॅलन्स नसताना, बँक देईल मोठी रक्कम, ओव्हरड्राफ्ट सुविधेचा उठवा फायदा, तारण ठेवा आणि सुविधा मिळवा 

पाहा व्हिडीओ –

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.