महाराष्ट्रात सोने चकाकले: मुंबईसह पुण्यात भाववाढ, जाणून घ्या-आजचे दर

आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली. 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 350 रुपयांची वाढ झाली. प्रति तोळा सोन्याचा भाव 48,590 वरुन 48,940 वर पोहोचला.

महाराष्ट्रात सोने चकाकले: मुंबईसह पुण्यात भाववाढ, जाणून घ्या-आजचे दर
सोने
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 6:57 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) मौल्यवान धातूंच्या किंमती वधारल्या आहेत. राजधानी दिल्लीत आज (बुधवारी) सोन्याच्या भावात (Gold Rate) 228 रुपयांनी वाढ नोंदविली गेली. प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,584 रुपयांवरुन 46,812 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भाव (Silver Rate) 271 रुपयांच्या वाढीसह प्रति किलो 59,932 रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भावात किंचित वाढ नोंदविली गेली. सोन्याला 1,818 प्रति औंस भाव मिळाला आणि चांदीचा भाव 22.70 प्रति औंसवर स्थिर राहिला.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील दर

मुंबई

आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली. 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 350 रुपयांची वाढ झाली. प्रति तोळा सोन्याचा भाव 48,590 वरुन 48,940 वर पोहोचला.

मागील पाच दिवसांतील मुंबईतील सोन्याचे भाव

• 12 जानेवारी: 48590/ प्रति तोळे • 11 जानेवारी :48,590/प्रति तोळे • 10 जानेवारी :48,610/प्रति तोळे • 09 जानेवारी :48,610 /प्रति तोळे • 08 जानेवारी :48,600/प्रति तोळे

पुणे

पुण्यात देखील सोन्याच्या भावात दोन अंकी वाढ नोंदविली गेली. 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 290 रुपयांची वाढ झाली. प्रति तोळा सोन्याचा भाव 48,340 वरुन 48,630 वर पोहोचला.

मागील पाच दिवसांतील सोन्याचे भाव दृष्टीक्षेपात

• जानेवारी 12 : 48630/प्रति तोळे • जानेवारी 11 :48,340 /प्रति तोळे • जानेवारी 10 :48,350/प्रति तोळे • जानेवारी 9 :48,350/ प्रति तोळे • जानेवारी 8 :48,340/प्रति तोळे

नागपूर

उपराजधानी नागपूरमध्ये सोन्याच्या भावात वाढ नोंदविली गेली. काल (मंगळवार) पेक्षा सोन्याचा भाव 350 रुपयांनी वधारला. प्रति तोळा सोन्याचा भाव 46,590 रुपयांवरुन 46,940 वर पोहोचला.

नाशिक

नाशिकमध्ये सोन्याच्या भावात वाढ दिसून आली. काल (मंगळवार) पेक्षा सोन्याचा भाव 280 रुपयांनी वधारला. प्रति तोळा सोन्याचा भाव 45,840 रुपयांवरुन 46,120 वर पोहोचला.

सोन्याच्या खरेदी विक्रीवर टॅक्स किती आणि कसा?

कोरोनाच्या काळात तर सोने खरेदी ही उत्तम गुंतवणूक मानली गेली. सोन्याच्या भावात नित्यनियमाने चढउतार झालेले पाहायला मिळतात. दरम्यान, सोन्यावर विविध टॅक्स लागत असतात. सोने खरेदी करताना आणि विक्री करताना देखील विविध स्वरुपाचे टॅक्स लागत असतात. जर आपण सोने खरेदीच्या 36 महिन्यांअगोदर सोने विक्रीला काढले तर शॉर्ट टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो आणि खरेदीच्या 36 महिन्यांनंतर सोने विक्री करताना लॉन्ग टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो.

कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो

दोन्ही रितीने कॅपिटल्स गेन टॅक्सचं कॅलक्युलेशन वेगवेगळ्या प्रकारे असते. जर खरेदीच्या 36 महिन्यांच्याअगोदर सोने विक्रीला काढले तर कॅपिटल्स गेन टॅक्स आपल्या मूळ किमतीवर जोडला जातो. आपण ज्या टॅक्स स्लॅबमध्ये येता त्याच्यानुसार आपल्याला टॅक्स चुकवावा लागतो. जर तुम्ही खरेदीच्या 36 महिन्यांच्या नंतर विक्री करत असाल तर त्यावर 20 टक्के टॅक्स लागतो. त्यावर सरचार्ज आणि एज्युकेशन सेस देखील लागतो. पाठीमागच्या सादर झालेल्या बजेटमध्ये LTCG वर सेस 3 टक्क्यांवरुन 4 टक्के इतका वाढवण्यात आला आहे. ज्यामुळे ज्यामुळे आता LTCG वर 20.80 टक्के इतका टॅक्स लागतो.

50 हजार रुपयांपर्यंतच्या गोल्ड गिफ्टवर टॅक्स नाही

जर कॅपिटल गेनऐवजी कॅपिटल लॉस झाला म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेवढ्या किमतीला आपण सोने खरेदी केले तेवढ्याच किमतीला आपल्या सोन्याची विक्री झाली तर टॅक्समध्येही आपल्याला सूट मिळते. भारतीय संस्कृतीत सोने शुभ मानले जाते. अनेक जण आपल्या प्रियजणांना सोने गिफ्ट स्वरुपातही देतात. एका आर्थिक वर्षात गिफ्टच्या रुपात 50 हजार रुपयांपर्यंतच्या गोल्ड गिफ्टवर टॅक्स लागत नाही.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण! सेल्फ कोरोना टेस्ट करणाऱ्यांनाही आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

UP Assembly Election 2022 : काल राजीनामा, आज अटक वॉरंट! स्वामी प्रसाद मौर्यांविरोधात ‘सोची समझी साजीश’?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.