Corona Update : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईकरांचा काहीसा प्रतिसाद, रस्ते, लोकलमधील गर्दी तुलनेने कमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळून गर्दी (Mumbai local train update) कमी करण्याचं आवाहन केलं होतं.

Corona Update : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईकरांचा काहीसा प्रतिसाद, रस्ते, लोकलमधील गर्दी तुलनेने कमी
Follow us
| Updated on: Mar 18, 2020 | 11:19 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळून गर्दी (Mumbai local train update) कमी करण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला मुंबईकर काहीसा प्रतिसाद देताना दिसत आहेत. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेत तुलनेने गर्दी कमी झाली आहे. शिवाय रस्त्यांवरील वाहतूक ओसरल्याचं चित्र आहे. (Mumbai local train update)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी गर्दी कमी करावी असे आवाहन काल केलं. जर तसं न झाल्यास नाईलाजाने लोकल, बससेवा बंद करावी लागेल असा इशारा दिला होता. शक्य तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचाही सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर गर्दी हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही कार्यालये बंद तर काही कार्यालयांमध्ये कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम केलं जात आहे. जिथे घरातून काम शक्य नाही अशा कार्यालयांमध्ये जाण्याशिवाय काहींना पर्याय नाही. त्यामुळे सकाळची विरार-चर्चगेट लोकल तुडुंब भरल्याचं दिसलं. मात्र तुलनेने गर्दी कमीच होती.

गाड्यांचे सीट कव्हर काढण्याचे आदेश

दरम्यान, टॅक्सीसह सार्वजनिक वाहनांमधील सीट कव्हर, कुशन्स काढून टाकण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. ट्रॅव्हल्स बस आणि टॅक्सी वाहतूकदारांना हे आदेश देण्यात आले आहेत.

खिडक्यांचे पडदेही काढून टाकून तातडीने अंमल करण्याच्या सूचना, परिवहन आयुक्तांनी  दिल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

…तर कठोर पावलं उचलावी लागतील

“मी पुन्हा आवाहन करतो आहे, आज देखील आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, अनावश्यक प्रवास टाळा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने आम्हाला कठोर पाऊले उचलावी लागतील. पण ती कठोर पाऊले उचलायची आमची इच्छा नाही. जनतेनं सहकार्य करावं,” असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.

कोरोनाबाधितांची संख्या 42 वर, पुण्यात नवा रुग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे. पुण्यात आणखी एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. फ्रान्स आणि नेदरलँड्सला फिरुन आलेल्या महिलेचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे. (France Return Pune Woman Corona)

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 10
  • पुणे – 8
  • मुंबई – 7
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • एकूण 42

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • मुंबई (1) – 17 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
  • पुणे (1) – 18 मार्च
  • एकूण – 42 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

संबंधित बातम्या 

CORONA : सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही, लोकल-बस सुरुच राहणार, नाईलाज झाल्यास बंद करु : मुख्यमंत्री  

Corona Update | 40 पैकी 7 जणांमध्ये तीव्र लक्षणे, 32 जणांमध्ये लक्षणे नाहीत, कोरोनाची सद्यस्थिती काय?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.