ईडीचा शरद पवारांना ई-मेल, तूर्तास चौकशीची गरज नाही!

तूर्तास चौकशीची गरज नाही, असं पत्र ईडीने शरद पवारांना ई मेलद्वारे पाठवलं आहे. त्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली. 

ईडीचा शरद पवारांना ई-मेल, तूर्तास चौकशीची गरज नाही!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ED mail to Sharad Pawar ) हे स्वत: आज ईडी कार्यालयात जाणार आहेत . मात्र त्यापूर्वीच ईडीचा फ्लॉ शो (ED mail to Sharad Pawar ) पाहायला मिळत आहे. कारण तूर्तास चौकशीची गरज नाही, असं पत्र ईडीने शरद पवारांना ई मेलद्वारे पाठवलं आहे. त्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली.  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार हे स्वत:हून आज ईडी कार्यालयात जात आहेत.

पवार स्वत: जात असल्याने राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी मुंबईत अनेक ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. मात्र शरद पवारांना ईडीने चौकशीचीच गरज आताही नाही आणि भविष्यातही नाही, असं पत्र ई मेलद्वारे पाठवलं आहे.

शरद पवारांनी ईडीला मेल केला होता, त्या मेलला उत्तर म्हणून ईडीने सध्या शरद पवारांच्या चौकशीची गरज नाही, असं म्हटलं.

याबाबत नवाब मलिक म्हणाले, “आम्हाला आधीपासून ते ईडी कार्यालयात येऊ नका म्हणत आहेत, मात्र गुन्हा का दाखल केला, कुणाच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल करत आहेत, हे ईडीने सांगावं. एकंदरीत ईडीने खेळखंडोबा भाजपच्या सांगण्यावरुन केला आहे. त्यांनी बोलावलं नाही पण आम्ही स्वत:हून जाणार आहोत. आमचा कार्यक्रम ठरला आहे.”

शरद पवार आज (27 सप्टेंबर) दुपारी दोन वाजता ईडीच्या मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर राहातील (Sharad Pawar ED office). दरम्यान, पवारांना ईडी कार्यालयाकडून बोलवण्यात आलेलं नाही ते स्वत:हून कार्यालयात जाणार असल्याने त्यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार, अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील 25 हजार कोटींच्या या व्यवहारात पैशांचा लाभ कुणाला हा तपासाचा मुख्य भाग आहे.

हेही वाचा : ईडीकडून झाडाझडती, चौकशीचे तीन टप्पे, दुसरा टप्पा अजित पवार, तिसरा टप्पा शरद पवार, पहिला कोण?

ईडीने शरद पवारांना अद्याप चौकशीला बोलावलेलं नाही. तर शरद पवार स्वत: ईडी कार्यालयात जाणार आहेत. ईडीचे मुंबईचे सहसंचालक शरद पवारांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. केवळ अर्धा तास ते तासाभरात पवारांना ईडीमधून सोडलं जाईल, अशीही माहिती आहे

ईडी प्रश्न विचारणार नाही

दरम्यान, शरद पवार दुपारी ईडी कार्यालयात जातील. मात्र, ईडीकडून त्यांना कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत. ईडीने अद्याप पवारांसाठीची प्रश्नावली तयार केलेली नाही. ईडीने अद्याप पवारांना चौकशीसाठी समन्स बजावलेला नाही. चौकशीसाठी कुणाला हजर करायचे हा तपास अधिकाऱ्याचा विशेषाधिकार असतो आणि त्यासाठी ठोस कारणं हवी असतात. सध्या ईडी या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करत असून, जबाब नोंदवण्यात येत आहेत. त्यामुळे आवश्यकता भासेल, तेव्हा पवार यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.

ईडीने शरद पवार, अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप तपास अधिकाऱ्याचीही नेमणूक केलेली नाही. त्यामुळे ईडी आज शरद पवारांना प्रश्न विचारणार नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *