शिवस्मारकाची रचना बदलण्याचा सरकारचा विचार

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रात उभारले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यासंबंधी शासकीय आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे. आधी अश्वारुढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असताना, आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासारखा उभा पुतळा उभारण्याचा विचार सरकारचा असल्याचे समोर आले आहे. शिवस्मारकाच्या पुतळ्याची रचना बदलण्याच्या विचारात सरकार असून, गुजरातमध्ये उभारण्यात …

शिवस्मारकाची रचना बदलण्याचा सरकारचा विचार

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रात उभारले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यासंबंधी शासकीय आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे. आधी अश्वारुढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असताना, आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासारखा उभा पुतळा उभारण्याचा विचार सरकारचा असल्याचे समोर आले आहे.

शिवस्मारकाच्या पुतळ्याची रचना बदलण्याच्या विचारात सरकार असून, गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासारखा उभा पुतळा बनवण्याचा विचार सरकारचा आहे.

वाचा – शिवस्मारकाचं काम तातडीने थांबवा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश

शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीची 27 नोव्हेंबर 2018 रोजी बैठक झाली. या बैठकीत पुतळ्याच्या रचनेविषयी चर्चा झाली. त्यात तीन ते चार पर्याय सादर करण्याचे प्रकल्प सल्लागाराला आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी तीन पर्याय हे अश्वारुढ पुतळ्याच्या पायाच्या रचनेत छोटे बदल केलेले आहेत, तर चौथा पर्याय हा सरदार वल्लभभाई पटेलांसारखा उभा पुतळा उभारण्याचा पर्याय आहे.

मुंबईतील विलेपार्ले येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेत हायवेशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्यासारखा पुतळा अरबी समुद्रात बनवण्याचा विचार आहे.

शिवस्मारकाच्या प्रकल्प सल्लागाराने चारही पर्यायांच्या छोट्या प्रतिकृती सरकारला सादर केल्या. मात्र, अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

उभा पुतळा कसा असेल?

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा उभा पुतळा उभारण्यात आला आहे. तसाच पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्याचा मानस महाराष्ट्र सरकारचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा करायचा ठरल्यास, त्याची उंची 153 मीटर करण्याचा विचार आहे. सरदार पटेलांच्या 152 मीटरच्या पुतळ्यापेक्षा एक मीटरने उंच पुतळा शिवरायांचा करण्याचा विचार असून, सध्या प्रस्तावानुसार शिवस्मारकाचा पुतळ्याची उंची 123.2 मीटर, तर चबुतरा 88.8 मीटर आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *