AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbaicha Raja | ‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द, ‘लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चा निर्णय

'मुंबईच्या राजा'ची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे

Mumbaicha Raja | 'मुंबईच्या राजा'ची 22 फुटांची मूर्ती रद्द, 'लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'चा निर्णय
फोटो सौजन्य : मुंबईचा राजा गणेश गल्ली फेसबुक पेज
| Edited By: | Updated on: Jun 23, 2020 | 6:31 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर मुंबईतील अनेक मोठमोठी गणेश मंडळे स्तुत्य निर्णय घेताना दिसत आहेत. ‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द करण्याची घोषणा मंडळाच्या सचिवांनी केली. (Lalbaug Sarvajanik Utsav Mandal Mumbaicha Raja Ganesh Galli decides to bring small Ganesha Idol)

‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार. मूर्ती लहान आणून उत्सवाची उंची वाढवणार असल्याची प्रतिक्रिया ‘लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चे सचिव स्वप्निल परब यांनी दिली.

अनेक वर्षांपासून मुंबईच्या राजा राजाची 22 फुटांची मनमोहक मूर्ती असते. प्रत्येक वर्षी इथे वेगवेगळ्या रुपातील बाप्पा दिसतो. केवळ भव्य मूर्तीच नाही तर मंडपातील देखावा पाहण्यासाठीही भाविक मोठी गर्दी करतात. परंतु यंदा गणेशभक्तांना मोठी मूर्ती पाहायला मिळणार नसली तरी उत्सवाचा उत्साह मात्र कायम असेल.

याआधी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय वर्गणीदारांवर गणेशोत्सवाचा आर्थिक बोजा पडू नये, यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात वर्गणीदारांकडून वर्गणी न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबईच्या राजातर्फे घेण्यात आला होता.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द

गिरणगावातील 101 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा लोकभावनेचा विचार करुन तसंच सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आणि पोलिसांवर असलेली जबाबदारी त्यांच्यावर गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करुन चिंतामणीच्या मंडपातच मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तीच्या उंचीबाबत शासन जे निर्देश देईल त्यानुसार, मूर्ती बनवण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली आहे. तसेच, मूर्ती जागेवर घडवण्यासाठी चिंतामणीच्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी दर्शवली आहे.

संबंधित बातम्या : 

23 फुटांऐवजी 3 फुटांची गणेशमूर्ती, ‘परळचा राजा गणेश मंडळा’चे चार स्तुत्य निर्णय

चिंचपोकळीच्या चिंतामणीची 100 वर्षांची परंपरा खंडित, आगमन सोहळा रद्द, मूर्तीबाबतही महत्त्वाचा निर्णय

(Lalbaug Sarvajanik Utsav Mandal Mumbaicha Raja Ganesh Galli decides to bring small Ganesha Idol)

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.