मुकेश अंबानींकडून पहिल्यांदाच काँग्रेसचा जाहीर प्रचार

मुंबई : रिलायन्सचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पहिल्यांदाच काँग्रेसचा जाहीर प्रचार केला आहे. त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात अंबानी यांनी मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले. देवरा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दक्षिण मुंबई लोकसभा …

मुकेश अंबानींकडून पहिल्यांदाच काँग्रेसचा जाहीर प्रचार

मुंबई : रिलायन्सचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पहिल्यांदाच काँग्रेसचा जाहीर प्रचार केला आहे. त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात अंबानी यांनी मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले. देवरा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यामान खासदार अरविंद सावंत यांचे प्रमुख आव्हान आहे.

देवरा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत अंबानी म्हणतात, ‘मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठीचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे 10 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मिलिंद यांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे सखोल ज्ञान आहे.’

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी खूप कमीवेळा राजकीय भाष्य केले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अंबानींनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला होता. आता त्यांनी देवरा यांना पाठिंबा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, ‘लहान दुकान चालवणाऱ्यापासून मोठ्या उद्योगपतीपर्यंत प्रत्येकासाठी दक्षिण मुंबई म्हणजे उद्योग आहे. आपल्याला पुन्हा एकदा तरुणांना प्राधान्य देत मुंबईत उद्योग आणायला हवेत आणि रोजगार निर्मिती करायला हवी.’ देवरा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत छोटे दुकान चालवणाऱ्यांपासून मोठ्या उद्योगपतींच्या प्रतिक्रिया आहेत. हे सर्व देवरा हेच दक्षिण मुंबईचे योग्य प्रतिनिधी असल्याचे म्हणत आहेत.

दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम म्हणजेच चौथ्या टप्प्यात मतदान होईल. 29 एप्रिलला होणाऱ्या या मतदानाच्या दिवशी दक्षिण मुंबईसह एकूण 17 मतदारसंघांसाठी मतदान होईल.

संबंधित बातम्या:

मुकेश अंबानींची मुलगी ईशाच्या लग्नाची खास पत्रिका, किंमत तब्बल….

कोट्यवधीचं मुखदर्शन! नीता अंबानींकडून सुनेला 300 कोटींचा हार 

भाजपला माज, अंबानींसाठी देश विकायला काढलाय: राज ठाकरे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *