मुकेश अंबानींची मुलगी ईशाच्या लग्नाची खास पत्रिका, किंमत तब्बल….

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. मुकेश अंबानी मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात गेल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं होतं. आता ईशाच्या लग्नासाठी जी पत्रिका तयार करण्यात आलीय, तिची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. या लग्नसोहळ्यासाठी जी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आलीय, […]

मुकेश अंबानींची मुलगी ईशाच्या लग्नाची खास पत्रिका, किंमत तब्बल....
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. मुकेश अंबानी मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात गेल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं होतं. आता ईशाच्या लग्नासाठी जी पत्रिका तयार करण्यात आलीय, तिची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे.

या लग्नसोहळ्यासाठी जी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आलीय, त्या एका पत्रिकेसाठी तब्बल तीन लाख रुपये खर्च केल्याचं बोललं जातंय. हे निमंत्रण सर्वसाधारण पत्रिकेसारखं नाही, हा एक बॉक्स आहे. हा बॉक्स उघडताच IA म्हणजे ईशा आणि आनंद असं लिहिलेलं दिसतं. शिवाय आतमध्ये एक डायरी, ज्यात लग्नाची संपूर्ण माहिती आणि चौथ्या पानावर एक पत्र आहे, जे ईशा आणि आनंद यांनी लिहिलेलं आहे.

या लग्नपत्रिकेला सोन्याच्या कडा आहेत. बॉक्स उघडताच गायत्री मंत्र ऐकायला मिळतो. ही आगळी वेगळी निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत तिचा विवाह होणार आहे. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल अनेक वर्षांपासून मित्र आहेत. शिवाय अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांचे गेल्या चार दशकांपासून मैत्रीचे संबंध आहेत. हेच मैत्रीचे संबंध आता नात्यांमध्ये बदलणार आहेत.

26 वर्षीय ईशा अंबानी रिलायन्स जिओ आणि रिटेल बोर्डाची सदस्य आहे. तिने प्रसिद्ध येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशिया अभ्यासात ग्रॅज्युएशन केलं आहे. ईशा याच वर्षी स्टॅण्डफोर्डच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर पूर्ण करणार आहे.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीचे जावई होणारे आनंद पिरामल प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या पिरामल रिअल्टीचे कार्यकारी संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची सुरुवात केली होती. ‘पिरामल स्वास्थ्य’कडून आज एकाच दिवसात तब्बल 40 हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केला जातो.

आनंद पिरामल इंडियन मर्चंट चेंबरच्या युवा विंगचे सर्वात कमी वयाचे अध्यक्षही होते. आनंज पिरामल यांनी पेंसिल्वेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केलं आहे. तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली.

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.