मुंबईत 99 हजार फेरीवाल्यांचे जागेसाठी अर्ज, 15 हजार फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणार

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 15 हजार फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणार आहे. (Mumbai 15 thousand Hawkers Get Own place)

मुंबईत 99 हजार फेरीवाल्यांचे जागेसाठी अर्ज, 15 हजार फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणार

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 15 हजार फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणार आहे. पालिकेच्या धोरणानुसार संपूर्ण मुंबईत 404 रस्त्यांवर 30 हजार 832 जागा फेरीवाल्यांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. यासाठी 99 हजार अर्जांची छाननी करण्यात आली होती. यात तब्बल 84 हजार अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी मुंबईत 17 हजार फेरीवाले पात्र ठरले होते. त्यात आता 15 हजार फेरीवाले पात्र ठरले आहेत. त्यामुळे आता मुंबईत एकूण 32 हजार फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणार आहे. (Mumbai 15 thousand Hawkers Get Own place)

मुंबई महानगरपालिकच्या नव्या धोरणानुसार फेरीवाल्यांना हक्काच्या जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेकडे तब्बल 99 हजार 435 फेरीवाल्यांनी जागेसाठी अर्ज सादर केले होते. या अर्जांच्या छाननीदरम्यान पालिकेने नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या होत्या.

यानुसार 1 हजार 745 हरकती-सूचना नोंदवल्या गेल्या. या हरकती-सूचनांनुसार पालिकेने सर्व 24 वॉर्डमध्ये 1 लाख 28 हजार 443 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. यातून सद्यस्थितीत पात्र ठरलेल्या 15 हजार 361 फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यांना लॉटरी पद्धतीने जागेचे वाटप करण्यात येणार आहे.

मुंबईत 24 विभागात 1,366 रस्त्यांवर 85, 891 फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी 1 हजार 745 नागरिकांच्या हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या. नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी केलेल्या हरकती आणि सूचना यावरही चर्चा करत योग्य ते बदल करण्यात आले होते. नागरिकांच्या, नगरसेवकांच्या हरकती आणि सूचना लक्षात घेत नगरपथ विक्रेता समितीला मान्यता देत मुंबईत एकूण 404 रस्त्यांवर 30 हजार 832 फेरीवाला जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

पालिकेने मुंबईतील 1 लाख 28 हजार 443 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यापैकी 24 विभागातून 99 हजार 435 अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करणारे 15 हजार 361 फेरीवाले पात्र ठरले आहेत. पात्र फेरीवाल्यांची योग्य ती माहिती संकलित करण्यात आली आहे. तसेच या पात्र फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

नगरपथ विक्रेता समितीतून नगरसेवक आऊट

केंद्र सरकारने फेरीवाला धोरण तयार केले असून देशभरात हे धोरण लागू होणार आहे. मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करताना नगरसेवकांना विश्वासात घेतले नसून नगरसेवक हे स्थानिक पातळीवर काम करतात. त्यामुळे नगरसेवकांना विश्वासात घेत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी सूचना शिवसेना सभागृह नेते विशाखा राऊत आणि विरोधी पक्षनेते रविराजा यांनी केली होती. पण पालिका प्रशासनाने सूचनेला बगल देत नगरपथ विक्रेता समितीतूनही नगरसेवकांना आऊट केले आहे. (Mumbai 15 thousand Hawkers Get Own place)

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिका नगरसेवकांच्या ‘प्रगती पुस्तकात’ घसरण! पहिल्या दहामध्ये शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक

मुंबई महापालिका दलालांमार्फत पैसे उकळत आहे, भाजप पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *